ती ब्रेकअप पार्टी! आकांक्षा दुबे मृत्यूप्रकरणी भोजपुरी सिंगर समर सिंहला अटक, होता फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 10:39 IST2023-04-07T10:36:28+5:302023-04-07T10:39:05+5:30
आकांक्षा आणि समर सिंह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. यंदा व्हॅलेंटाईन डेला आकांक्षानेच या नात्याचा खुलासा केला होता.

ती ब्रेकअप पार्टी! आकांक्षा दुबे मृत्यूप्रकरणी भोजपुरी सिंगर समर सिंहला अटक, होता फरार
भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे मृत्यूप्रकरणी भोजपुरी सिंगर समर सिंह याला अटक करण्यात आली आहे. आकांक्षा प्रकरणी त्याचे नाव समोर येत होते. परंतू, पोलिस पुरेसे पुरावे नसल्याने त्याला ताब्यात घेत नव्हती. मध्यरात्री गाझियाबादमधून समर सिंहला ताब्यात घेण्यात आले आहे.
आकांक्षाच्या आईने मुलीचा मृत्यू आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आरोप केला होता. यामध्ये तिने समरलाच आरोपी असल्याचे म्हटले होते. अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या मृत्यूनंतर समर सिंह फरार झाला होता. पोलिसही त्याच्या मागावर होते. आकांक्षाच्या आईने समरवर आपल्या मुलीला ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला होता.
२६ मार्च रोजी आकांक्षा दुबे वाराणसीतील एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. आकांक्षा भोजपुरी गायक समर सिंगसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात होते. आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप तिच्या आईने केला होता. लग्नाच्या बहाण्याने शरीर संबंध निर्माण केले. समरने आकांक्षाचा आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप केला आहे.
आकांक्षा आणि समर सिंह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. यंदा व्हॅलेंटाईन डेला आकांक्षानेच या नात्याचा खुलासा केला होता. मृत्यूच्या एक दिवस आधी आकांक्षा आणि समर एका पार्टीला गेले होते. 25 मार्चच्या रात्री आकांक्षा बर्थडे पार्टीसाठी निघाली तेव्हा ती खूप खुश होती. ती ब्रेकअप पार्टी होती, असे पोलिसांनी सांगितले.