वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या भोजपुरी अभिनेत्रीस अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 12:09 IST2021-11-24T12:08:40+5:302021-11-24T12:09:13+5:30
कोलकाताची असणारी प्रिया ( २२) ही भोजपुरी गाण्यांच्या अल्बममध्ये काम करते. ती इंटरनेट संकेतस्थळावरून वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरविणे आणि शहरात लॉजमध्ये खोली बुक करून देण्याचे काम करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांना मिळाली होती.

वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या भोजपुरी अभिनेत्रीस अटक
मीरा रोड : ऑनलाईन वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या भोजपुरी गाण्यांच्या अल्बममध्ये काम करणाऱ्या तरुणीस मीरा-भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने सोमवारी अटक करून दोन पीडित तरुणींची सुटका केली आहे.
कोलकाताची असणारी प्रिया ( २२) ही भोजपुरी गाण्यांच्या अल्बममध्ये काम करते. ती इंटरनेट संकेतस्थळावरून वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरविणे आणि शहरात लॉजमध्ये खोली बुक करून देण्याचे काम करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पाटील यांनी सोमवारी बोगस गिऱ्हाईकामार्फत सापळा रचला. मीरा रोडच्या सिनेमॅक्स चौक, मनमंदिर स्वीटसमोर बनावट गिऱ्हाईकास पाठविले. पाटीलसह उमेश पाटील, विजय निलंगे, केशव शिंदे, सुप्रिया तिवले, सुनीता आवताडे, गावडे यांनी पैसे स्वीकारताच पूजाला पकडून पीडित तरुणींची सुटका केली. याप्रकरणी तिचा साथीदार रवी साहू याचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.