Bhiwandi fighting video: पूर्णा गावाजवळ वाहतूक पोलीस व वाहन चालकामध्ये बुधवारी दुपारी झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वाहतूक पोलिस विजय चव्हाण यांनी टेम्पो चालकास वाहतूक कोंडीमुळे टेम्पो थांबवण्याचा इशारा दिला. परंतु टेम्पो चालकाने टेम्पो न थांबवल्याने वाहतूक पोलिस व वॉर्डन यांनी टेम्पो चालकास थांबवून जाब विचारला. त्यावेळी टेम्पो चालकाने पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.
यावेळी टेम्पो चालकास खाली उतरवण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिस करत असताना टेम्पो चालकाने वाहतूक पोलिस विजय चव्हाण यांना ठोसे मारण्यास सुरूवात केली.या घटनेचा संपूर्ण प्रकार मोबाईल मध्ये चित्रित झाल्याने मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.या प्रकरणी विजय चव्हाण यांनी नारपोली पोलिस ठाण्यात टेम्पो चालका विरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.