बीड सरपंच हत्याकांडाचे भिवंडी कनेक्शन समोर; मित्राच्या घरी आले होते आरोपी, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 23:31 IST2025-01-05T23:30:32+5:302025-01-05T23:31:12+5:30
आरोपी सुदर्शन घुले इतर दोन आरोपी आसऱ्यासाठी आले होते भिवंडीत

बीड सरपंच हत्याकांडाचे भिवंडी कनेक्शन समोर; मित्राच्या घरी आले होते आरोपी, पण...
नितीन पंडित
भिवंडी - बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपींचे भिवंडी कनेक्शन समोर आले आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले त्याच्या इतर दोन साथीदारांसह तिघेही हत्याकांडानंतर ११ डिसेंबरला भिवंडीत आपल्या ओळखीच्या मित्राकडे राहायला आला होते. मात्र भिवंडीत आसरा मिळाला नसल्याने त्याच दिवशी तिघेही आरोपी भिवंडीतून गुजरातला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
९ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर तिन्ही मुख्य आरोपी ११ डिसेंबर रोजी भिवंडीतील समाजसेवक सोन्या पाटील यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर आरोपींनी बीड येथील त्यांच्या गावशेजारील व ओळखीचे भिवंडीत राहणारे विक्रम डोईफोडे यांची ओळख सांगितली. त्यांनतर सोन्या पाटील यांच्या कार्यालयातील व्यवक्तीने विक्रम डोईफोडे यांना आरोपी सुदर्शन घुले याचा फोटो विक्रम डोईफोडे यांना पाठवला मात्र ते वैष्णो देवी येथे देवदर्शनाला गेले होते. फोटो पाहून त्यांनी आरोपी सुदर्शन घुले यांना ओळखलं. देशमुख हत्येमध्ये घुलेचा समावेश असल्याच्या बातम्या समोर आल्याने विक्रम डोईफोडे यांनी त्यांना आसरा देण्यास नकार दिला.
यानंतर तीनही आरोपींनी त्यांच्या गावातील ओळखीचा तरुण रवी बारगजे याचा तपास काढला. रवी हा भिवंडीतील वळपाडा येथील विक्रम डोईफोडे यांच्याच बार आणि रेस्टोरेन्ट मध्ये काम करत असल्याने रवी यानेही विक्रम डोईफोडे यांना कॉल करून तीनही आरोपी बारवर आले असल्याची माहिती दिली मात्र विक्रम यांनी त्यांना राहण्यास देऊ नका असे सांगितल्याने तीनही आरोपी लघुशंकेचे नाव सांगून थेट तेथून पळून गेल्याची माहिती विक्रम डोईफोडे यांनी दिली आहे.