शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण : गौतम नवलखा यांना सुनावणीसाठी नियमित हजर राहण्याचे निर्देश द्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 2:16 PM

Bhima Koregaon Case : राज्य सरकारच्या वतीने मुंबई हायकोर्टात युक्तिवाद 

ठळक मुद्देमात्र त्या परिस्थितीत त्यांना अटकेपासून दिलासा द्यावा लागेल असं सांगितले आहे. सुनावणीसाठी हायकोर्टात नियमित हजर राहण्याचे निर्देश द्या असे राज्य सरकारच्या वतीने मुंबई हायकोर्टात आज सांगण्यात आले.

मुंबई - भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गौतम नवलखांना अटकपूर्व जामीनावरील सुनावणीसाठी हायकोर्टात नियमित हजर राहण्याचे निर्देश द्या असे राज्य सरकारच्या वतीने मुंबई हायकोर्टात आज सांगण्यात आले. त्यावर हायकोर्टाने सरकारी पक्षाने तसा रीतसर अर्ज दाखल करावा, मात्र त्या परिस्थितीत त्यांना अटकेपासून दिलासा द्यावा लागेल असं सांगितले आहे. आज दुपारी पुन्हा या प्रकरणी सुनावणी होणार आहे. 

गौतम नवलखा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयाने मंगळवारी फेटाळल्याने नवलखा यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या अपिलावर आज सुनावणी सुरु आहे. गौतम नवलखा यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची आवश्यकता आहे, असे निरीक्षण नोंदवित विशेष यूएपीए न्यायालयाने गौतम नवलखा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी फेटाळला. त्यामुळे नवलखा यांनी विशेष न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.नवलखा यांचे संबंध बंदी घातलेल्या सीपीआय (एम)बरोबर असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. त्याशिवाय अनेक दहशतवादी व देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. २८ ऑगस्ट २०१८ रोजी पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र, त्याच दिवशी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या ट्रान्झिट रिमांडवर अंतरिम स्थगिती दिली. नवलखा यांनी त्यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, उच्च न्यायालयाने १५ ऑक्टोबर रोजी त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु, सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना दिलासा देण्यास नकार देत काही आठवडे अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले व योग्य त्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्याची मुभा दिली.सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिल्यामुळे नवलखा यांनी थेट उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. त्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांना विशेष न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नवलखा यांनी पुणे विशेष न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला. परंतु, मंगळवारी न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. 

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारHigh Courtउच्च न्यायालयGovernmentसरकारCourtन्यायालयMumbaiमुंबई