शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Bhima Koragaon Case : आनंद तेलतुंबडे यांनी एनआयएकडे केले आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 15:06 IST

Bhima Koregaon Case : आनंद तेलतुंबडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी आत्मसमर्पण केले. 

ठळक मुद्देसुप्रीम कोर्टाने देखील १७ मार्चला त्यांच्या याचिका फेटाळल्या आणि तीन आठवड्यात आत्मसमर्पण करण्यास कोर्टाने सांगितले. ९ एप्रिलला सुप्रीम कोर्टाने शेवटची संधी म्हणून एका आठवड्याची मुदतवाढ आत्मसमर्पण करण्यास दिली.

मुंबई -  भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरण आनंद तेलतुंबडे यांनी मंगळवारी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेसमोर (एनआयए) आत्मसमर्पण केले, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले. आनंद तेलतुंबडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी आत्मसमर्पण केले. तेलतुंबडे यांचे वकील मिहीर देसाई यांनी मुंबईतील कंबाला हिल येथील एनआयए कार्यालयात आनंद तेलतुंबडे पोचले असल्याचे सांगितले. 

Bhima Koregaon : गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम  दिलासा  

फेब्रुवारी २०१९ मध्ये पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी कारवाई केली होती. मात्र 'मी कोणत्याही बेकायदा कार्यवाहीत सहभागी झालेली नाही आणि कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराशी माझा काहीही संबंध नाही', असा दावा करत आनंद तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यांच्यावरील एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. तेलतुंबडे, गौतम नवलखा आणि इतर अनेकजणांवर माओवाद्यांचा संबंध असल्याचा आणि सरकार उलथवण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायदा (यूएपीए) च्या कडक तरतुदीखाली गुन्हा दाखल करण्यात आला.अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम संरक्षण दिलं होतं. अलीकडेच भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टानं फेटाळला होता. मात्र, मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोघांना अटकेपासून ४ आठवड्यांचा दिलासा देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, सुप्रीम कोर्टाने देखील १७ मार्चला त्यांच्या याचिका फेटाळल्या आणि तीन आठवड्यात आत्मसमर्पण करण्यास कोर्टाने सांगितले. नंतर ९ एप्रिलला सुप्रीम कोर्टाने शेवटची संधी म्हणून एका आठवड्याची मुदतवाढ आत्मसमर्पण करण्यास दिली. 

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाMumbaiमुंबईSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालय