शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा भारद्वाज यांचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 19:49 IST

काश्मीरमध्ये निर्माण झालेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न इतर राज्यात निर्माण करण्याचा सुधा भारद्वाज यांचा प्रयत्न होता, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी शनिवारी न्यायालयात दिली.

ठळक मुद्देदेशातील युनिव्हर्सिटीमधील हुशार मुलांना संघटनेत सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याचे काम

पुणे : काश्मीरमध्ये निर्माण झालेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न इतर राज्यात निर्माण करण्याचा सुधा भारद्वाज यांचा प्रयत्न होता.संघटनेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना कुठे पाठवायचे याची जबाबदारी त्यांच्याकडे होती, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी शनिवारी न्यायालयात दिली.भारद्वाज यांना शनिवारी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. देशातील विविध युनिव्हर्सिटीमधील हुशार मुलांना संघटनेत सहभागी होण्यासाठी प्रेरित करायचे आणि त्यांना संघटनेच्या कामासाठी गरज असलेल्या ठिकाणी पाठवण्याचे काम भारद्वाज करीत असल्याचे सिद्ध झाले आहे. सीपीआयकडून आयएपीएलला आलेला फंड कशा पद्धतीने वापरला. संघटनेत किती विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले? ते विद्यार्थी कोण होते? त्यांना कोठे पाठवण्यात आले? याचा तपास त्यांच्याकडे करायचा आहे. महाराष्ट्र, पंजाब आणि काश्मीरमधील देखील विद्यार्थी संघटनेत सहभागी झाले असण्याची शक्यता आहे. या सर्वांचा तपास करण्यासाठी त्यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा सरकारी वकील पवार यांनी न्यायाधीश किशोर वडणे यांच्याकडे केली.बचाव पक्षाकडून अ‍ॅड. राहुल देशमुख यांनी युक्तिवाद केला. भारद्वाज यांच्याकडून यापूर्वीच सर्व प्रकारचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलीस कोठडी घेऊन नवीन माहिती मिळण्याची शक्यता नाही. तसेच पोलिसांना काही जप्त करायचे नाही. त्यामुळे त्यांना कमीत कमी कोठडी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.नजरकैद म्हणजे न्यायालयीन कोठडी नाही, नजरकैद म्हणजे काय हे कायद्यात स्पष्ट करण्यात आलेले नाही.  सुप्रीम कोर्ट नजरकैद म्हणजे काय ते ठरवेल.  त्यामुळे भारद्वाज यांना अटक करताना पोलिसांना शपथपत्र सादर करण्याची गरज नाही - जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय