शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

सावधान! WhatsApp वर आलेला 'हा' मेसेज करू शकतो तुमचं बँक खातं रिकामं; पाहा काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 17:24 IST

सध्या अनेकांच्या WhatsApp वर Amazon कडून गिफ्टसाठी सर्व्हे सुरू असल्याची एक लिंक व्हायरल होत आहे.

ठळक मुद्देसध्या अनेकांच्या WhatsApp Amazon कडून गिफ्ट घेण्यासाठी सर्व्हे सुरू असल्याची एक लिंक व्हायरल होत आहे. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी ती लिंक योग्य आहे का नाही हे तपासणं आवश्यक आहे.

सध्या WhatsApp चा वापर करत नसेल अशा व्यक्ती फारच कमी असतील. परंतु आता या अॅपचा वापर करून युझर्सची फसवणूक होत असल्याच्या घटना सध्या घडताना दिसत आहे. नुकताच WhatsApp वर एक सर्व्हे मेसेज व्हायरल होत आहे. Amazon च्या माध्यमातून तुम्हाला गिफ्ट मिळेल असा सर्व्हे WhatsApp च्या माध्यमातून फिरत आहे. परंतु तुमच्याकडे हा मेसेज आला असेत तर तुम्ही नक्कीच मोठ्या स्कॅममध्ये फसू शकता. कारण हा बनावट मेसेज असून यात कोणतंही तथ्य नाही. 

या मेसेजमध्ये एक URL देण्यात आली असून यावर क्लिक केल्यास तुम्हाला मोफत गिफ्ट जिंकण्याची संधी मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावर क्लिक केल्यानंतर एक सर्व्हेंचं पेज ओपन होतं. यावर काही वैयक्तीक माहितीही मागितली जाते. यामध्ये युझरचं वय, जेंडर, अॅमेझॉनला तुम्ही किती रेटिंग द्याल असे अनेक प्रश्न विचारले जातात. याशिवाय यामध्ये तुम्ही अँड्रॉईड फोन किंवा आयफोन यापैकी कोणत्या स्मार्टफोनचा वापर करता असंही विचारलं जातं. या पेजवर एक टायमर आहे जो त्या व्यक्तीला अर्जन्सी फील करवून देतो आणि संबंधित युझर त्यात फसतो. यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर युझरला त्यांच्या स्क्रिनवर काही गिफ्ट बॉक्स दिसतात. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही हुवावे मेट ४० हा स्मार्टफोन जिंकल्याचं सांगितलं जातं. परंतु हे गिफ्ट मिळवण्यासाठी तुम्हाला ते क्विझ पाच ग्रुप किंवा २० व्यक्तींसोबत शेअर करण्यास सांगितलं जातं. 

असं वाचा या फ्रॉडपासून अशा कोणत्याही सर्व्हेमध्ये अनेकदा युझरला कोणतंही गिफ्ट मिळत नाही, परंतु युझर यात अडकला जातो. या क्विझचं जे युआरएल दिसतं ते बनावट आहे. अनेकदा अशा लिंक्स आल्यानंतरही युझर्स याबाबत सतर्क असल्याचं दिसून येत नाही. परंतु अशा सर्व्हेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं गिफ्ट देण्यात येत नाही. अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी युझर्सनं सतर्क राहणं आणि खऱ्या URL ओळखणं अनिवार्य आहे. जेव्हा तुम्ही या युआरएलकडे पाहाल तर यामध्ये कताही जंक आणि अनवॉन्टेंड कॅरेक्टर्सही दिसून येतील.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपCrime Newsगुन्हेगारीbankबँकMONEYपैसा