मोबाईलवरील ऑनलाईन गेमिंगचे व्यसन तरुण पिढीसाठी किती घातक ठरू शकते, याचा एक अत्यंत हृदयद्रावक प्रकार मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये समोर आला आहे. ऑनलाईन गेमिंगच्या नादात अडकलेल्या एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. अंश साहू असे या मुलाचे नाव असून, तो आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. आईने मोबाईल वापरण्यावरून रागावल्याचा राग मनात धरून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
नेमकं प्रकरण काय?
समोर आलेल्या माहितीनुसार, पिपलानी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीराम कॉलनीमध्ये अंश साहू आपल्या कुटुंबासह राहत होता. तो आठवीत शिकत होता. अलीकडेच अंशच्या आजोबांचे निधन झाले होते. सोमवारी त्यांच्या तेराव्याचा विधी होता. कुटुंबातील सर्व सदस्य या विधीला गेले होते, मात्र अंश घरीच थांबला होता. दुपारी जेव्हा आई-वडील घरी परतले, तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ हाका मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला असता, आत अंश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
आईच्या खात्यातून २८ हजार रुपये उडाले!
अंशला ऑनलाईन गेमिंगचे प्रचंड व्यसन जडले होते. तो 'ब्लू व्हेल'सारखे धोकादायक आणि चॅलेंजवर आधारित गेम्स खेळायचा. या व्यसनापायी त्याने आपल्या आईच्या बँक खात्यातून तब्बल २८ हजार रुपये ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवर उडवले होते. मुलाचे वागणे बदलल्याचे आणि अभ्यासात लक्ष नसल्याचे पाहून दीड महिन्यापूर्वीच पालकांनी त्याचा मोबाईल काढून घेतला होता.
आई मोबाईलवरून रागावली अन्...
घटनेच्या दिवशी अंशने आईच्या पर्समधून चोरून मोबाईल काढला आणि पुन्हा गेम खेळण्याचा प्रयत्न केला. हे पाहून आईने त्याला कडक शब्दांत फटकारले. या रागामुळे अंश प्रचंड तणावाखाली होता. आई-वडील काही कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून त्याने घरातच स्वतःला संपवून घेतले. जेव्हा पालक घरी आले, तेव्हा त्यांना मुलाचा मृतदेह पाहावा लागला. अवघ्या काही तासांत हसत्याखेळत्या घराचे रूपांतर स्मशानशांततेत झाले.
पोलीस तपास सुरू
पिपलानी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून अंशचा मोबाईल जप्त केला आहे. त्याच्याकडे कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. "अंशला मोबाईलचे व्यसन होते, हे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. त्याच्या डिजिटल अॅक्टिव्हिटीची तपासणी केली जात आहे," अशी माहिती अतिरिक्त पोलीस उपायुक्त गौतम सोलंकी यांनी दिली.
Web Summary : A 14-year-old in Bhopal, addicted to online gaming, tragically ended his life after being scolded for using his mother's phone. He had previously spent 28,000 rupees from her account on games like 'Blue Whale'. Police are investigating his digital activity.
Web Summary : भोपाल में ऑनलाइन गेमिंग के आदी 14 वर्षीय लड़के ने माँ के फोन इस्तेमाल करने पर डांटे जाने के बाद आत्महत्या कर ली। उसने पहले 'ब्लू व्हेल' जैसे गेम पर 28,000 रुपये खर्च किए थे। पुलिस उसकी डिजिटल गतिविधि की जांच कर रही है।