सावधान... समुद्र किनाऱ्यावर बॉम्ब सदृष वस्तू सापडल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 17:45 IST2018-09-26T17:03:31+5:302018-09-26T17:45:55+5:30

सावधान... समुद्र किनाऱ्यावर बॉम्ब सदृष वस्तू सापडल्याने खळबळ
अलिबाग - कुलाबा किल्ल्याच्यामागे समुद्रात बाॅम्ब सदृष वस्तू आढळल्याने परिसरात एकाच खळबळ माजली आहे. घटनास्थळी बाॅम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झाले आहे. समुद्र किनाऱ्यावरिल कुलाबा किल्ल्या मागील समुद्रात बाॅम्ब सदृश्य वस्तू पाण्यासोबत वाहात आली आहे.
सापडलेल्या वस्तूवर "डू नाॅट टच; नाेटीफाय पाेलीस"असे इंग्रजीत लिहीले असल्याने किल्ल्यातील लाेकांना याची माहिती दिल्याचे अलिबाग पाेलीस सूत्रांनी 'लाेकमत'शी बाेलताना सांगितले. वाहत आलेल्या या संशयास्पद वस्तूची खातरजमा करण्याकरिता तसेच बाॅम्ब असल्यास ताे डिफ्यूज करण्याकरिता रायगड पाेलिसांचे बाॅम्ब शोधक आणि नाशक पथक आणि दाेन बाॅम्ब शाेधक श्वानांसह घटनास्थळी पाेहाेचले आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.