शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! बँक मॅनेजरने ग्राहकांच्या दागिन्यांवर लावला सट्टा; तब्बल २.७ किलो सोनं लॉकरमधून गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 13:20 IST

बंगळुरूमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने बँकेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

बंगळुरूमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने बँकेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. एका बँकेच्या डेप्युटी मॅनेजरने विश्वासाला तडा देत ग्राहकांचं तब्बल २,७८० ग्रॅम म्हणजेच २.७ किलो सोनं गुपचूप लॉकरमधून काढलं. त्यानंतर हे सोनं एका खासगी फायनान्स कंपनीत गहाण ठेवून ३.५ कोटी रुपयांहून अधिक रकमेवर डल्ला मारला आहे.या संपूर्ण प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे आरोपी मॅनेजरने या पैशांचा वापर ऑनलाईन सट्टेबाजीमध्ये केला. 

गिरी नगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बँकेच्या मुख्य व्यवस्थापकांनी ५ फेब्रुवारी रोजी गिरी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर या घोटाळ्याचा उलगडा झाला. तक्रारीत नमूद केल्यानुसार आरोपीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना न देता हे पाऊल उचललं. पोलिसांनी सांगितलं की, या प्रक्रियेत ग्राहकांच्या हक्कांचं उल्लंघन झालं असून ही घटना बँकिंग सुरक्षेसाठी गंभीर इशारा आहे.

तपासादरम्यान पोलिसांना काही पुरावे मिळाले आहेत. आरोपीने सोन्याच्या बदल्यात मिळालेल्या रकमेचा वापर ऑनलाईन सट्टेबाजीसाठी केला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण केवळ आर्थिक फसवणुकीचं नसून मोठा गुन्हा आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आतापर्यंत सुमारे ७०० ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं आहे.

फायनान्स कंपन्यांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्यामुळे पोलिसांना आता न्यायालयाचा आधार घ्यावा लागू शकतो. उर्वरित सोनं सुरक्षितपणे परत मिळवण्यासाठी पोलीस कायदेशीर पावलं उचलत आहेत. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असून सर्व बाबी लक्षात घेऊन दोषींवर कडक कारवाई केली जाईल.

या घटनेनंतर पोलिसांनी ग्राहकांना आवाहन केलं आहे की, त्यांनी आपल्या लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांची सुरक्षा आणि स्थितीची वेळोवेळी तपासणी करावी. तसेच लोकांनी बँकिंग सुरक्षा नियमांचं पालन करावं आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित माहिती द्यावी, असा सल्लाही दिला आहे. ही घटना ग्राहकांचा विश्वास आणि बँकिंग प्रणालीच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं करतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Bank manager gambles away customer's gold; 2.7 kg missing

Web Summary : A bank deputy manager in Bengaluru embezzled 2.7 kg of customer gold from lockers, using it for online betting after pawning it for ₹3.5 crore. Police arrested him and recovered 700 grams of gold. An investigation is ongoing.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBengaluruबेंगळूरbankबँकGoldसोनंPoliceपोलिसArrestअटक