धक्का लागला म्हणून तरुणाला सळईने मारहाण
By नामदेव भोर | Updated: April 11, 2023 15:32 IST2023-04-11T15:32:17+5:302023-04-11T15:32:38+5:30
मुंबई नाका भागात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली घटना

धक्का लागला म्हणून तरुणाला सळईने मारहाण
नामदेव भोर, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: मुंबई नाका भागात कालिका मंदिराच्या बाजूला हॅप्पी टाईम्स हॉटेल येथे रविवारी (दि.९) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एका तरुणाला लोखंडी सळईने माहराण झाल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॅप्पी टाईम्स हॉटेल येथे रोहीत चंद्रकांत सोनवणे उभे असताना पायी जाणाऱ्या चार अनोळखी संशयितांनी त्यांना धक्का देत कुरापत काढून शिवीगाळ केली. तसेच दमबाजी करून लोखंडी सळईने मारहाण केली. याप्रकरणात जखमी झालेले रोहीत चंद्रकांत सोनवणे यांनी मुबई पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी चार अनोळखी संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक वंसत शेळके या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, नाशिक शहरात दिवसेंदिवस हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून किरकोळ कारणांवरून होणाऱ्या मारहाणीत अनेकजण गंभीर जखमी होत आहे. अशाप्रकारे हाणामारी करून दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत टवाळखोरांनी पोलिसांसमोर गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे आव्हान उभे केले आहे.