लिव्ह इनमध्ये राहत असलेल्या ब्युटीशिअनचा संशयास्पद मृत्यू, बॉयफ्रेंड म्हणाला - ती नशेत झाली होती टल्ली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 10:59 IST2022-10-12T09:26:02+5:302022-10-12T10:59:40+5:30
Bhopal Crime News : ब्यूटीशिअन प्रेमा लांबा तमंग मुळची सिक्कीमची राहणारी होती. ती भोपाळमध्ये एका तरूणासोबत एका महिन्यापासून लिव्ह इनमध्ये राहत होती.

लिव्ह इनमध्ये राहत असलेल्या ब्युटीशिअनचा संशयास्पद मृत्यू, बॉयफ्रेंड म्हणाला - ती नशेत झाली होती टल्ली...
Bhopal Crime News : भोपाळमध्ये एका तरूणासोबत लिव्ह-इनमध्ये राहत असलेल्या सिक्कीमच्या ब्युटीशिअनचा संशयास्पद मृत्यू झाला. तरूणीच्या शरीरावर काच आणि चाकूने वार केल्याच्या खूणा आढळून आल्या. पण तिच्या बॉयफ्रेंडने सांगितले की, तिने आत्महत्या केली. आता पोलीस चौकशी करत आहेत की, ही हत्या होती की आत्महत्या.
डीसीपी राजेश भदोरिया यांनी सांगितलं की, ब्यूटीशिअन प्रेमा लांबा तमंग मुळची सिक्कीमची राहणारी होती. ती भोपाळमध्ये एका तरूणासोबत एका महिन्यापासून लिव्ह इनमध्ये राहत होती.
मृत तरूणीच्या प्रियकराने सांगितलं की, शनिवारी रात्री दोघेही दारू प्यायले होते. या दरम्यान त्याला एका दुसऱ्या तरूणीचा फोन आला आणि मी तिच्यासोबत बोलू लागलो. यावरून नशेत ती रागावली आणि मला मारहाण करू लागली होती. त्यानंतर तिने घरातील वस्तूंचीही तोडफोड केली.
प्रियकर म्हणाला की, मी फोनवर बोलत बोलत दुसऱ्या रूममध्ये गेलो आणि आतून कडी लावून घेतली. थोड्या वेळाने बाहेर येऊन पाहिलं तर तिने काच आणि चाकूने स्वत:वर वार केले होते. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
असं सांगितलं जात आहे की, प्रेमा रोहित नगरमध्ये ब्युटी पार्लरमध्ये नोकरी करत होती. तिची ओळख शहडोल येथे राहणाऱ्या हर्ष केशरवानीसोबत सोशल मीडियावर झाली होती. मग दोघांचं अफेअर सुरू झालं होतं. नुकताच त्यांनी एका ठिकाणी फ्लॅट भाड्याने घेऊन दोघेही लिव्ह इनमध्ये राहत होते.
सध्या पोलीस केसचा तपास करत आहेत. प्रेमाच्या परिवारातील लोक सिक्कीमहून भोपाळला येण्याची वाट बघितली जात आहे. त्यानंतर तिचं शवविच्छेदन केलं जाईल. रिपोर्टनंतर योग्य ती कारवाई केली जाईल.