आमच्या दुष्मनाच्या घरी जायचे नाही म्हणत केली एकाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 20:13 IST2020-05-26T20:05:20+5:302020-05-26T20:13:33+5:30
रिव्हॉल्वरसारख्या हत्याराने जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना वडवली परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.

आमच्या दुष्मनाच्या घरी जायचे नाही म्हणत केली एकाला मारहाण
कल्याण - आमच्या दुष्मनाच्या घरी जायचे नाही असे बोलत एका ३० वर्षीय व्यक्तीला धक्काबुक्की करुन त्याच्या घरावर पाच जणांनी दगडफेक करत घरातील वस्तूंचे नुकसान केले. इतकेच नाहीतर, रिव्हॉल्वरसारख्या हत्याराने जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना वडवली परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.
वडवलीमध्ये राहणारा राहुल भंडारी (३०) सोमवारी रात्री १० च्या सुमारास आपल्या दिवेश पाटील या मित्राला भेटून घराच्या दिशेने जात होता. यावेळी, याच परिसरात राहणा-या विलास भोईरने दिवेश हा आमचा दुश्मन आहे, तू त्याचे घरी यायचे नाही असे बोलून राहुलसह त्याच्या आईवडिलांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. राहुलच्या घरावर दगडफेक करत घराच्या खिडकीची काच फोडून नुकसान केले. तसेच, कुणाल म्हात्रे, राहुल पाटील, विलास भोईर, अनिकेत भोईर यांनी राहुलच्या घरात घुसून संगणक आणि मोबाईल फोडून नुकसान केले. तर राहुल पाटील आणि कुणालने रिव्हॉल्वरसारखे दिसणारे हत्यार दाखवत गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचे राहुलने खडकपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी राहुलने दिलेल्या तक्रारीवरुन खडकपाडा पोलिसांनी विलाससह त्याच्या साथीदारांविरोधात सोमवारी गुन्हा दाखल केला.
Coronavirus : ओशिवरा पोलीस ठाणे बनले कोरोनाचा हॉटस्पॉट
बापरे! विहिरीत पडलेल्या 'त्या' ९ जणांची हत्या फक्त प्रेयसीचा खून लपवण्यासाठीच