पिंपरीत जुन्या वादातून आरोपींची फिर्यादीच्या मुलाला दगडाने मारहाण ; जीवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 14:09 IST2018-12-27T14:08:06+5:302018-12-27T14:09:15+5:30
जुन्या भांडणाच्या कारणावरुन आरोपींनी फिर्यादीच्या मुलाच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

पिंपरीत जुन्या वादातून आरोपींची फिर्यादीच्या मुलाला दगडाने मारहाण ; जीवे मारण्याची धमकी
पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरुन आरोपींनी फिर्यादीच्या मुलाच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध फिर्याद दाखल झाली आहे. त्यातील दोन मुले अल्पवयीन आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशिनाथ विठोबा शिंदे (वय ५५, रा. हडपसर) असे फिर्यादीचे नाव आहे. राजू अब्दुल पठाण (वय १९,रा. लोणावळा) या आरोपीसह अन्य दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. फिर्यादीचा मुलगा अक्षय यास आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ व हाताने मारहाण केली. एका अल्पवयीन आरोपीने अक्षयच्या डोक्यात आणि पाठीत दगड मारुन त्यास गंभीर जखमी केले. राजु पठाण या आरोपीला अटक करण्यात आली असून वाकड पोलीस अधिक तपास करत आहे.