पिंपरीत पूर्ववैमनस्यातून एकाला बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:28 IST2018-12-10T13:28:15+5:302018-12-10T13:28:49+5:30
गांधीनगरसमोर वरदहस्त इमारतीजवळ पूर्ववैमनस्यातून शनिवारी दोघांनी एकाला बेदम मारहाण केली.

पिंपरीत पूर्ववैमनस्यातून एकाला बेदम मारहाण
पिंपरी :पूर्ववैमनस्यातून शनिवारी दोघांनी एकाला बेदम मारहाण केली. ही घटना गांधीनगरसमोर वरदहस्त इमारतीजवळ घडली. या प्रकरणी दोघांविरूद्ध पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश लक्ष्मण कांबळे (वय, २६) यांनी पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. शनमन गायकवाड (वय, २४), राहुल सुर्वे (वय, २५) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी, पिंपरी गणेश वरदहस्त सोसायटीसमोरील बसथांब्यात गांधीनगर येथे बसलेल्या फिर्यादीला दोघांनी पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून मारहाण केली. लाथा बुक्यांनी मारहाण केली. त्याचबरोबर गायकवाड या आरोपीने पाठीमागून डोक्यात कठीण वस्तुने मारल्याने फिर्यादी जखमी झाले आहेत. या प्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
अशीच दुसरी घटना संत तुकारामनगर येथे घडली आहे. पीसीएमसी उद्यानाजवळ एका चहाच्या टपरीजवळ एक मोटार उभी केली होती. ही मोटार कोणाची आहे. टपरीसमोर का लावली. याची विचारणा केल्याचा राग आल्याने मोटारीतून आलेल्या दोघांनी टपरीचालकाला मारहाण केली. नितीन नंदकुमार मेश्रा असे टपरीचालक फिर्यादीचे नाव आहे. अज्ञात आरोपींविरोधात पिंपरी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.