शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पौड येथे पूरपीडितांविषयक मेसेज व्हाटसअ‍ॅपवर पाठविल्याने युवकाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 12:56 IST

सांगलीतील कुंडल गावातील रहिवाशी युवकाचे लाड सरकार आणि एल ग्रुप हे व्हॉटसअ‍ॅप समुह आहेत..

ठळक मुद्देमारहाण करणारे पाचजण सांगलीचे रहिवाशी : पौड येथील घटना

पुणे :  सांगली जिल्हयातील पूरपीडीत व रहिवाशांविषयीचा मेसेज व्हाटस अँपवर पाठविल्याने एका युवकाला पाचजणांनी मारहाण केली. मारहाण करणारे सर्वजण सांगली येथे राहणारे आहेत. मारहाणीची घटना पौड रस्ता येथे घडली. या प्रकरणी गुरूप्रसाद लाड, जगदीश लाड, सूरज लाड, संदीप लाड, आशुतोष लाड (सर्व रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अजित उत्तम लाड (वय २२,रा. मोरे श्रमिक वसाहत, कोथरूड) याने यासंदर्भात कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित लाड मूळचा कुंडलचा आहे. लाड पौड रस्ता भागातील मोरे श्रमिक वसाहतीत राहायला आहे. सांगलीतील कुंडल गावातील रहिवाशी युवकाचे लाड सरकार आणि एल ग्रुप हे व्हॉटसअ‍ॅप समुह आहेत. कुंडल गावात आलेल्या पुरानंतर अजित  लाडने गावातील व्हॉटसअ‍ॅप समुहावर काही संदेश पाठविले होते. आमदार साहेब मदत करतात. बाकीचे लाडोबा कुठे गेले,असा संदेश त्याने समुहावर पाठविला होता.त्यानंतर आरोपी गुरूप्रसाद, जगदीश, सूरज, संदीप, आशुतोष मोटारीतून पहाटे पुण्यात आले. त्यांनी अजितच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तु बदनामी करणारा संदेश का पाठविला? अशी विचारणा त्यांनी केली. त्यानंतर  अजितला त्याने घरातून बोलावून घेतले. पहाटे साडेचारच्या सुमारास अजितला पौड रस्त्यावर नेले. आरोपींनी त्याला तेथे रबरी ट्यूबने बेदम मारहाण केली. माराहाणीत अजितचे कपडे फाटले. त्यानंतर गावात येऊन  आमची माफी मागायची नाही तर तुला मारून टाकू, अशी धमकी देऊन आरोपी मोटारीतून पसार झाले. अजितने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर खटके तपास करत आहेत.

टॅग्स :PaudपौडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSangliसांगली