पिंपरीत मुलानेच आईला केली रॉडने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 17:39 IST2019-07-15T17:38:49+5:302019-07-15T17:39:33+5:30
घरगुती वादातून आईच्या अंगावर मिरचीची पुड टाकली. तसेच लोखंडी रॉडने पायावर मारहाण करुन हातपाय तोडण्याची धमकी दिली.

पिंपरीत मुलानेच आईला केली रॉडने मारहाण
पिंपरी : घरगुती वादातून पोटच्या मुलाने आईच्या अंगावर मिरचीची पुड टाकली. तसेच लोखंडी रॉडने पायावर मारहाण करुन हातपाय तोडण्याची धमकी दिली. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री दीडच्या सुमारास सिध्दार्थनगर दापोडी येथे घडली.
याप्रकरणी ५५ वर्षीय जखमी आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांचा मुलगा अतुल नवनाथ डांगे (रा. पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतुल हा जखमी ५५ वर्षीय महिलेचा मुलगा आहे. रविवारी रात्री दीडच्या सुमारास तो त्याच्या आईच्या घरात घुसला. तसेच घरगुती वादातून आईच्या अंगावर मिरचीची पुड टाकली. तसेच लोखंडी रॉडने पायावर मारहाण करुन हातपाय तोडण्याची धमकी दिली. भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.