शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
2
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
3
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
4
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
5
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
6
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
7
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
8
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
9
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
10
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
11
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
12
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
13
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
14
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार
15
खळबळजनक! T20 World Cup मध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, वेगवेगळ्या नंबरवरून आले फोन
16
ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री
17
फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य
18
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी
19
सुख-शांती हिरावून घेऊ शकतं स्मार्टफोनचं व्यसन; 'या' आजारांचा धोका, काय आहे Nomophobia?
20
पश्चिम बंगालमध्ये नवा ट्विस्ट! CM ममता बॅनर्जी भाजपा खासदाराच्या घरी; चर्चांना उधाण

सावधान! लॉकडाऊनकाळात दहशतवादी, नक्षली संधीच्या शोधात; बेरोजगारांनो पडू नका फंदात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 4:59 PM

नक्षलवाद्यांपासून ते दहशतवादी संघटनांकडे त्यांनी यासाठी त्यांचे स्लीपर सेल्स सक्रिय करण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्दे लॉकडाऊननंतर ते बेरोजगार तरुणांची भरती करण्यात सक्षम होतील, असा विश्वास या संघटनांचा आहे. जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन, लष्कर-ए-तैयबा काश्मीरमधील आपली मुळे मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे दहशतवादी संघटना आणि नक्षलवाद्यांनीही अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाचा फायदा उठविण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांपासून ते दहशतवादी संघटनांकडे त्यांनी यासाठी त्यांचे स्लीपर सेल्स सक्रिय करण्यास सुरूवात केली आहे.

लॉकडाऊननंतर ते बेरोजगार तरुणांची भरती करण्यात सक्षम होतील, असा विश्वास या संघटनांचा आहे. गुप्तचर यंत्रणेच्या अशा बातम्यांमुळे सुरक्षा यंत्रणांचे कान टवकारले आहेत. अशी  माहिती मिळते की, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन, लष्कर-ए-तैयबा काश्मीरमधील आपली मुळे मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

उत्तर प्रदेश, तामिळनाडू, केरळ, ओडिसा, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही अशाच प्रकारच्या नक्षलवाद्यांच्या सक्रियतेचा आढावा घेण्यात येत आहे. छत्तीसगड, झारखंड, ओडिसा यासारख्या राज्यात नक्षलवाद्यांनी नवीन भरतीसाठी खेड्यांमध्ये संपर्क वाढविला आहे. सीआरपीएफ या सर्व घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. सुरक्षा दलांचे डीआयजी इंटेलिजेंस एम. दिनाकरन म्हणतात, सुरक्षा दलांनी तिथे घट्ट पकड केली आहे. सतत कारवाईमुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे आता मोडले आहे.लॉकडाउनच्या नवीन परिस्थितीत ते नवीन भरती घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. सुरक्षा दलांच्या कारवाईमुळे गेली दोन वर्षे नक्षल क्षेत्रात नवीन नक्षलवादी भरती जवळपास रेंगाळली होती.

काश्मीरमध्येही प्रयत्न केले जात आहेतकलम  ३७० रद्द झाल्यानंतर काश्मीरमध्ये आता लॉकडाऊन झाला होता. यामुळे दहशतवाद्यांच्या भरती प्रक्रियेस जास्त चालना माळली नव्हती. जम्मू-काश्मीरचे  डीजीपी दिलबाग सिंह म्हणतात की, दहशतवादी आता नवीन सदस्यांची भरती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दोन-तीन वर्षांत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरूद्ध अनेक मोठ्या कारवाया केल्यात. स्थानिक पातळीवरील दहशतवाद्यांनी अनेक तरुणांची दिशाभूल केली आणि त्यांना त्यांच्या संघटनेत समाविष्ट केले.सुरक्षा दलाने १ ६० अतिरेकी ठार मारले तेव्हा त्यांनी स्थानिक पातळीवर नवीन भरती करण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरवात केली. सुमारे १४० स्थानिक तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले. यातील बरेच तरुण परत आले, बरेच ठार झाले. आता हे दहशतवादी कोरोनाच्या लॉकडाऊनचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :terroristदहशतवादीnaxaliteनक्षलवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद