सावधान! तुम्हाला समुद्रात संशयास्पद हालचाली दिसल्यास 1093 क्रमांकावर संपर्क साधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 15:35 IST2019-02-27T15:32:58+5:302019-02-27T15:35:05+5:30
समुद्रात मासेमारीला जातांना योग्य कागदपत्रे, खलाशीे ओळखपत्रे घेऊन जावीत.

सावधान! तुम्हाला समुद्रात संशयास्पद हालचाली दिसल्यास 1093 क्रमांकावर संपर्क साधा
मुंबई - 26/11 च्या मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब व त्याचे साथीदार कुलाब्याच्या बधवार पार्कमधून मुंबईत शिरून त्यांनी मुंबईवर अतिरेकी हल्ला केला होता.
काल पहाटे आपल्या वायुदलाच्या 12 लढाऊ मिराज विमानांनी पाकिस्तानात घुसून जैश ए मोहम्मदच्या सुमारे 350 अतिरेक्यांचा अड्डा उध्वस्त करून त्यांना कंठस्थान घातले होते. या धर्तीवर देशात हायअलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत. मच्छिमार बांधवांनी डोळ्यात तेल घालून सतर्क असावे. तसेच समुद्रात मासेमारीला जातांना योग्य कागदपत्रे, खलाशीे ओळखपत्रे घेऊन जावीत. तसेच कोणतीही संस्थास्पद बोटी किंवा हालचाली, वस्तू आढळल्यास त्वरित 1093 वर संपर्क साधून सुरक्षा यंत्रणेला सतर्क करावे यासाठी आता मच्छिमार संघटना पुढे आल्या आहेत. कुलाब्याच्या मच्छिमार सर्वोदय सहकारी सोसायटीने फलक लावून त्यांच्या मच्छिमार सभासदांना सतर्क केले आहे. तर वेसावा नाखवा मंडळाने देखील त्यांच्या सभासदांना आणि खलाश्यांना मासेमारी करतांना सतर्क राहण्यास सांगितले असल्याची माहिती या मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र काळे यांनी दिली.