शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्याच्या फोनवरील OTP ने उलगडलं २ वर्षांपूर्वीच्या 'मर्डर'चं रहस्य; 'ती' होती जिवंत, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 11:29 IST

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून पोलीस ज्या महिलेच्या हत्येचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत होते, ती महिला अचानक जिवंत असल्याचं आता समोर आलं.

उत्तर प्रदेशमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून पोलीस ज्या महिलेच्या हत्येचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत होते, ती महिला अचानक जिवंत असल्याचं आता समोर आलं. ज्या महिलेच्या हत्येचा तपास सुरू होता, ती महिला दुसऱ्या राज्यात एका दुसऱ्या व्यक्तीसोबत सुखाने संसार करत असेल, याची पुसटशी कल्पनाही पोलिसांना नव्हती. आता ती महिला सापडली आहे.

कप्तानगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिलखाये गावात ही घटना घडली आहे. प्रियंका प्रजापती हिचं २०१७ मध्ये संदीपसोबत लग्न झालं होतं. त्यांना एक मुलगाही आहे. आठ वर्षे सर्व काही सुरळीत चाललं होतं, मात्र त्यानंतर दोघांमध्ये खटके उडू लागले. दोन वर्षांपूर्वी प्रियंका पतीवर रागावून लाखो रुपयांचे दागिने आणि मुलाला सोबत घेऊन माहेरी आली. त्यानंतर काही तासांतच ती मुलासह माहेरूनही निघून गेली.

आत्महत्येचा विचार सोडून थाटला नवा संसार 

प्रियंकाचं म्हणणं आहे की, ती घरातून आत्महत्या करण्यासाठी बाहेर पडली होती. तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला पण तिची हिंमत झाली नाही. अखेर ती अयोध्येला रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचली. तिथे तिची भेट राजस्थानच्या मंगल चंद्र नावाच्या व्यक्तीशी झाली. काही दिवसांतच तिने आत्महत्येचा विचार सोडून मंगलसोबत नवीन आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला.

चार जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल

पत्नी आणि मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने पती संदीप निराश झाला होता. संदीपने जेव्हा प्रियंकाच्या माहेरी जाऊन चौकशी केली, तेव्हा काही लोकांनी त्याला सांगितलं की, दागिन्यांच्या हव्यासापोटी तिच्या वडिलांनीच प्रियंका आणि मुलाची हत्या करून मृतदेह सरयू नदीत फेकून दिला आहे. या माहितीच्या आधारे संदीपने नोव्हेंबर २०२४ मध्ये प्रियंकाचे वडील दयाराम, आई सुभावती देवी यांच्यासह चार जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.

मोबाईलवरील मेसेजने झाला खुलासा 

एके दिवशी संदीपच्या मोबाईलवर प्रियंकाचे आधार कार्ड आणि फोटो बदलण्यासाठी एक OTP मेसेज आला. हा मेसेज पाहून संदीपला संशय आला आणि त्याने तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तपास केला असता, आधार कार्डमधील फोटो बदलण्यासाठी राजस्थानमधून अर्ज करण्यात आल्याचं समजलं. या धाग्यादोऱ्यांचा पाठलाग करत पोलीस प्रियंकापर्यंत पोहोचले.

पत्नी होती जिवंत 

संदीपचा मुलगाही तिच्यासोबतच होता. या सर्व प्रकाराचा खुलासा झाला असला तरी, आता या कथेत एक नवीन वळण आलं आहे. पत्नीने दिलेल्या या धक्क्यामुळे पती संदीप आता प्रियंकाला सोबत ठेवायला तयार नाही. तसेच तिचे आई-वडील, ज्यांनी हत्येचा खोटा आरोप सहन केला, तेही तिला स्वीकारण्यास नकार देत आहेत. दुसरीकडे प्रियंकालाही तिच्या नवीन पतीसोबत म्हणजेच मंगलसोबतच राहायचे आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : OTP on Husband's Phone Unravels 2-Year-Old 'Murder' Mystery

Web Summary : A woman presumed dead for two years was found alive in Rajasthan. Her husband filed a murder case against her parents, but an OTP message led police to her. She's now with another man, and neither her husband nor parents want her back.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश