baran girls rape case : gang rape on two minor girls for three days In Rajasthan? | उत्तर प्रदेशनंतर राजस्थान, दोन अल्पवयीन मुलींवर तीन दिवस सामूहिक बलात्कार?

उत्तर प्रदेशनंतर राजस्थान, दोन अल्पवयीन मुलींवर तीन दिवस सामूहिक बलात्कार?

ठळक मुद्देदोन अल्पवयीन मुलींना कोटा, जयपूर आणि अजमेर येथे नेऊन आरोपींनी बलात्कार केल्याचा आरोप पोलिसांना काही सांगितल्यास जिवे मारण्याची आरोपींनी दिली धमकी दोन्ही मुलींनी आपल्या जबाबामध्ये आपल्यावर बलात्कार झाला नसल्याचे सांगितल्याचे बारां येथील पोलिसांचा दावा

जयपूर - देशभरात महिला आणि मुलींवर होत असलेले अत्याचार ही चिंतेची बाब बनले आहेत. उत्तर प्रदेशातील हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असतानाच आता राजस्थानमदील बारां येथे दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांकडून काहीही सांगण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप करण्यात येत आहे. 

दोन अल्पवयीन मुलींना कोटा, जयपूर आणि अजमेर येथे नेऊन आरोपींनी बलात्कार केल्याचा आरोप होत आहे. तसेच याबाबत पोलिसांना काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आरोपींनी सुरुवातीला दोन्ही अल्पवयीन मुलींचे अपहरण केले. त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. आरोपींनी सलग तीन दिवस या तरुणींवर बलात्कार केल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार पीडित मुलींच्या वडिलांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस पीडित मुली आणि एका अल्पवयीन आरोपीला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. यावेळी पीडित मुलींच्या वडिलांनी आपल्याला न्याय देण्याची विनंती केली. मात्र जेव्हा या मुलींना बोलण्यास सुरुवात केली तेव्हा आरोपींनी पोलिसांसमोरच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

पकडण्यात आलेल्या आरोपींना पोलिसांना सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या आरोपींनी कुटुंबीयांना किंवा पोलिसांना काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी पीडित मुलीना दिली आहे. दरम्यान, दोन्ही मुलींनी आपल्या जबाबामध्ये आपल्यावर बलात्कार झाला नसल्याचे सांगितल्याचे बारां येथील पोलिसांनी सांगितले आहे. तसेच दोन्ही मुलींच्या वैद्यकीय चाचणीमध्ये बलात्काराला दुजोरा मिळाला नसल्याचाही दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर एसपींनी सांगितले की, जर पीडित मुलींच्या म्हणण्यानुसार त्यांना घाबरवून धमकावून जबाब घेतले गेले असतील तर पुढील कारवाईसाठी परवानगी घेऊन पुन्हा जबाब नोंदवले जातील.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही या मुलींवर बलात्कार झाला नसल्याचे तसेच या मुलींनी आपण स्वेच्छेने तरुणांसोबत फिरायला गेल्याचे आपल्या जबाबात म्हटल्याची माहिती दिली आहे. या घटनेची हाथरस येथील घटनेशी तुलना करणे दुर्भाग्यपूर्ण असल्याचेही गहलोत यांनी म्हटले आहे. 

 

 

English summary :
Rajasthan after Uttar Pradesh, gang rape on two minor girls for three days In Rajasthan?

Web Title: baran girls rape case : gang rape on two minor girls for three days In Rajasthan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.