शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बारामती नगरपालिकेची तिजोरी चोरट्याने फोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 16:00 IST

नगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील अकाऊंट विभागात असणाऱ्या कक्षाची काच काढून चोरट्याने थेट तिजोरी फोडली.

ठळक मुद्दे१५ लाखाची रोख रक्कम लंपास 

बारामती : बारामती नगरपालिकेतील तिजोरी फोडून सुमारे १५ लाख रूपये चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी (दि. २६) मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकारानंतर बारामती शहरात खळबळ उडाली असून शहर पोलिसांनी घटनास्थळाची तातडीने पाहणी केली आहे. नगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील अकाऊंट विभागात असणाऱ्या कक्षाची काच काढून चोरट्याने थेट तिजोरी फोडली. धक्कादायक बाब म्हणजे इमारतीचा मुख्य दरवाजा व इतर दरवाजांनाही कुलूप नसल्याचे यावेळी निदर्शनास आले. तसेच सध्या मार्च एंडीगमुळे मोठ्याप्रमाणात असणारा भरणाऱ्या तिजोरीमध्ये ठेवण्यात आला होता.  तसेच रात्री साडेअकरापर्यंत येथील कार्यालयीन कामकाज सुरू होते, अशी माहिती मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनी दिली.  येथील सीसीटीव्हीमध्ये चेहरा झाकलेला एक चोरटा आढळून आला आहे. रात्री कोणताही आवाज आला नाही, असे येथील सुरक्षा रक्षकाने सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. 

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसThiefचोर