शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

नागपुरात  बनावट चेक देऊन बँकेला घातला २०.७६ लाखाचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 12:30 AM

बनावट चेकद्वारे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि मुंबईच्या कंपनीला २०.७६ लाखाचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अभियंता आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.

ठळक मुद्देअभियंत्यासह दोघांना अटक : रॅकेट सक्रिय असल्याची शंका

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : बनावट चेकद्वारे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि मुंबईच्या कंपनीला २०.७६ लाखाचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अभियंता आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.अजय दशरथ आसुटकर (३२) रा. वडगाव रोड, चंद्रपूर आणि महेश एकनाथ धकिते (३५) रा खापा, नरखेड अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार नितीन नारायण निखारे, रेशीमबाग हा फरार आहे. मुंबईतील स्वतंत्र मायक्रोफिन प्रा. लि. कंपनीचे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या दादर शाखेत खाते आहे. २४ जानेवारीला अजय आसुटकरने बेसाच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियात स्वतंत्र मायक्रोफिन प्रा. लि. कंपनीचा बनावट चेक जमा केला. बँकेने या चेकवर २०.७६ लाखाची रक्कम दिली. ही रक्कम अजय आसुटकरच्या हायटेक पॉवर इंजिनिअरिंगमध्ये जमा झाली. अजय अभियंता आहे. तो सोलर पॉवरची शाखा चालवितो. त्याच्या खात्यातून रक्कम महेश धकिते आणि नितीन निखारेच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली. ही रक्कम आरोपींनी खात्यातून काढूनही घेतली. स्वतंत्र मायक्रोफिन प्रा. ली. कंपनीच्या खात्यातून २०.७६ लाखाची रक्कम काढण्यात आल्यामुळे बँकेच्या संचालकांनी बँकेशी संपर्क साधला. त्यांनी बँकेने कुणालाच या रकमेचा चेक दिला नसल्याचे सांगितले. त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बेसा शाखेला खरी माहिती समजली. व्यवस्थापक प्रीती पाटील यांनी बेलतरोडी ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला. अजय आसुटकर आणि महेश धकितेने नितीन निखारेने चेक दिल्याचे सांगितले. नितीनने त्यांना या कामासाठी दोन-दोन लाखाचे चेक दिले होते. त्या आधारे पोलिसांनी दोघांना अटक केली. महेश धकिते आणि नितीन निखारे प्रॉपर्टीच्या व्यवसायात दलालीचे काम करतात. नितीन निखारे हाती लागल्यानंतर यातील खरी माहिती उजेडात येणार आहे. त्याने ज्या पद्धतीने बनावट चेकचा वापर केला, त्यावरून तो फसवणूक करण्यात पटाईत असल्याचे कळते. अजय आणि महेशला न्यायालयात हजर करून ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास दुय्यम निरीक्षक दिलीप साळुंके करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीbankबँक