बडोदा बँकेच्या नगर शाखेत नऊ लाखांचा अपहार!
By अण्णा नवथर | Updated: October 13, 2023 18:35 IST2023-10-13T18:34:50+5:302023-10-13T18:35:05+5:30
याप्रकरणी माजी व्यवस्थापकाविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बडोदा बँकेच्या नगर शाखेत नऊ लाखांचा अपहार!
अहमदनगर: बडोदा बँकेच्या अहमदनगर शहरातील माणिक चौक शाखेत ग्राहकांच्या खात्यावरील पैसे स्वत:च्या खात्यावर घेत तत्कालीन व्यवस्थापकाने नऊ लाखांचा अपहर केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी माजी व्यवस्थापकाविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बडोदा बँकेच्या माणिक चौकातील शाखेचे तत्कलानीन अधिकारी पौखोचीन गुईटे ( रा. पट्टा, चांदपूर, मणिपूर ) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत माणिक शाखेचे व्यवस्थापक दिलीप अनंतराव ढोबळे यांनी फिर्याद दिली आहे. बँकेचे वरील अधिकारी यांची अहमदनगर येथून जून महिन्यात गुहाटी येथील शाखेत बदली झाली. त्यांनी येथील पदभार ढोबळे यांच्याकडे सोपविला.
व्यवस्थापक पदाचा पदभार घेतल्यानंतर ढोबळे यांनी बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी केली. त्यात तत्काली अधिकारी गुईटे यांनी ग्राहकांच्या खात्यातील पैसे त्यांच्या खात्यात घेऊन नऊ लाखांचा अपहार केल्याचे समोर आले आहे, असे फिर्यादीत म्हंटले आहे.