शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

बँक फ्रॉड : राजेश शर्मा, संधू, अनघा मोडकला बेड्या, सुरतचा वरुण, पुण्याची अनघा मास्टरमाइंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 08:55 IST

पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले की, अनघा मोडक ही शेअर ब्रोकर म्हणून व्यवसाय करत होती. मात्र, तिचा व्यवसाय बंद पडला होता. एकमेकांच्या माध्यमातून या सर्वांचा परिचय झाल्याचे ते सांगत आहेत. वरुण याने हा सर्व डेटा मिळवून दिला आहे.

पुणे : डॉरमंट (निष्क्रिय) खात्याचा गोपनीय डेटा मिळवून त्याची विक्री करून त्याद्वारे कोट्यवधी रुपये कमविण्याच्या या कटाचे मास्टर माइंड सुरतचा वरुण वर्मा आणि पुण्याची अनघा मोडक हे दोघे असल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, औरंगाबादचे राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधू तसेच अनघा अनिल मोडक (४०, रा. वडगाव) यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करणार आहेत.सायबर पोलिसांनी काल ८ जणांना अटक केली होती. त्यांच्यातील आणखी तिघांना आज अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून जप्त केलेला डेटा हा त्यांनी गुजरात, सुरत व हैदराबाद येथून मिळविल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून गुन्हे शाखेची पथके तिकडे रवाना झाली आहेत.

२५ लाखांत व्यवहार करण्यासाठी आले, आणि... - 

डेटा विकत घेऊन हॅकर्सच्या मदतीने खात्यातील पैसे मिळविण्यासाठी अनघा अशा काही हॅकर्सच्या संपर्कात होती. त्यातूनच तिची औरंगाबादच्या विशाल बेंद्रेशी ओळख झाली. तो प्लॉटिंगचा व्यवसाय करतो. त्याच्या मार्फत राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधू यांच्याशी संपर्क झाला. डेटाच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांपैकी काही पैसे औरंगाबाद येथील राजेश शर्मा आणि परमजित संधू या दोघांना हवे होते. त्यासाठी अनघा त्यांच्याकडे अडीच कोटींची मागणी करत होती. मात्र त्यांच्याकडे एवढे पैसे नसल्यामुळे २५ लाखांत त्यांना तो व्यवहार करून हवा होता. पैसे घेऊन शर्मा व संधू दोघे पुण्यात आले होते. पोलिसांनी सिंहगड रोडवरील भटेवरा याच्या घरासमोर यातील सर्वांना पकडले. तेव्हा इतरांबरोबरच शर्मा आणि संधू हेही होते. त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना आज अटक केली.

राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधू हे दोघेही सध्या आर्थिक अडचणीत सापडले होते. न्यूज चॅनेल बंद पडल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. झटपट पैसे मिळविण्याच्या नादात त्यांचा अनघाशी संपर्क झाला होता. तिच्याकडून डेटा घेऊन ते औरंगाबादमधील एकाला पुढे विकणार होते. तसेच हॅकर्सच्या मदतीने या खात्यांमधील पैसा काढून घेण्याचा त्यांचा कट होता.

या आरोपींकडे मिळालेला २१६ कोटी रुपयांचा डेटा हा केवळ ५ खात्यांशी संबंधित आहे. त्यातील एक खाते सक्रियही आहे. आणखी काही सूत्रधार असून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हा सर्व प्रकार अधिक सुस्पष्ट होईल. यात काही बँकेशी संबंधितांचाही हात असण्याची शक्यता आहे.- भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त

अनघाला हवे होते अडीच कोटी पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले की, अनघा मोडक ही शेअर ब्रोकर म्हणून व्यवसाय करत होती. मात्र, तिचा व्यवसाय बंद पडला होता. एकमेकांच्या माध्यमातून या सर्वांचा परिचय झाल्याचे ते सांगत आहेत. वरुण याने हा सर्व डेटा मिळवून दिला आहे. या डेटाचा वापर करुन बँक खातेदारांच्या खात्यावरील पैसे काढून देण्याची जबाबदारी अनघा हिने घेतली होती. तसेच ती हा डेटा विकत घेणाऱ्यांचा शोध घेत होती. तिला काही जण तसेच भेटलेही होते. मात्र, तिला त्यातून अडीच कोटी रुपये हवे होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिसbankबँक