लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: ज्या खासगी स्कूल व्हॅनमध्ये चालकाने चिमुकलीवर अत्याचार केला, ती व्हॅन शाळेच्या अंतर्गतच चालविण्यात येत होती. त्यामुळे तिला नेमके संरक्षण कोणाचे? असा प्रश्न आहे. खासगी स्कूल व्हॅन असतानाही शाळा प्रशासनाने त्याला परवानगी दिली कशी, याचाही तपास पोलिस करत आहेत. बदलापूरमध्येच नव्हे तर अंबरनाथमध्येही बहुसंख्य शाळांमध्ये खासगी स्कूल व्हॅन चालविण्यात येतात. आरटीओचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
चालत्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी पडला होता. त्यानंतर आठवडाभर आरटीओने कारवाई केली होती. मात्र पुन्हा तशीच परिस्थिती आहे. अत्याचाराच्या घटनेनंतर ठाण्यात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाई होईल या भीतीने शुक्रवारी काही स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले.
बदलापूर स्टेशन परिसरात पोलिस बंदोबस्त
बदलापूरमध्ये दीड वर्षापूर्वी चिमुकलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर हजारो नागरिकांनी रेल्वेस्थानकात आंदोलन केले होते. त्यामुळे गुरुवारच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासन सतर्क झाले. रेल्वे स्टेशनमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये कोणतेही आंदोलन होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
शहरात तणाव निर्माण होऊ नये या अनुषंगाने पोलिस सतर्कता बाळगत आहेत. त्यासोबत बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये देखील सुरक्षेच्या अनुषंगाने पूर्व आणि पश्चिम भागात सुरक्षा बल तैनात केले आहे. संबंधित शाळेच्या परिसरातही पोलिस बंदोबस्त आहे. अत्याचार प्रकरणानंतर पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे.
प्री-प्रायमरीला परवानगी कशी?
अंबरनाथ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विशाल कोतेकर यांनी शाळेच्या परवानगीबाबत कोणतेही ठोस उत्तर दिले नाही. प्री-प्रायमरी आणि नर्सरी आपल्या परवानगीच्या अखत्यारीत नसल्याचे कारण देऊन त्यांनी दिले. त्यामुळे प्री-प्रायमरीला परवानगी मिळतेच कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Web Summary : Outrage follows a school van assault in Kalyan. Questions arise about the van's oversight and school permissions. RTO negligence is also under scrutiny. Police presence increases at Badlapur station amid public anger and safety concerns.
Web Summary : कल्याण में स्कूल वैन हमले के बाद आक्रोश। वैन की देखरेख और स्कूल की अनुमति पर सवाल उठते हैं। आरटीओ की लापरवाही भी जांच के दायरे में है। जनता के गुस्से और सुरक्षा चिंताओं के बीच बदलापुर स्टेशन पर पुलिस की मौजूदगी बढ़ी।