शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
4
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
5
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
6
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
7
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या शेणॉय यांचा जागतिक स्तरावर डंका
8
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
9
उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
10
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
11
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
12
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
13
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
14
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
16
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
17
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
18
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
19
रात्री खोकल्याचं औषध प्यायला, पण सकाळी उठलाच नाही; ५ वर्षाच्या मुलाच्या मृत्युनं खळबळ!
20
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 

बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 15:14 IST

Swami Chaitanyananda Saraswati Latest News: दिल्लीतील डर्टी बाबाचे वेगवेगळे कारनामे समोर येत आहेत. स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांचे इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतही संबंध होते, असे तपासातून समोर आले.  

Swami Chaitanyananda Saraswati accused of Sexual Harassment: आश्रम वेब सीरिजमधील बाबा निरालाचे चाळे तुम्ही बघितले असतील. पण, दिल्लीतील स्वामी चैतन्यानंद सरस्वतीने बाबा निरालालाही मागे टाकले आहे. विद्यार्थिनींना धमक्या देऊन त्यांना संबंध ठेवण्यास भाग पाडणाऱ्या बाबा चैतन्यानंद सरस्वतीचा मोबाईल अनेका कांडांचे पुरावे असलेली तिजोरीच ठरला आहे. स्वामी चैतन्यानंदचे इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत महिलासोबतच संबंध होते. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

विद्यार्थिनीसह महिलांनाही शय्यासोबत करायला लावणाऱ्या स्वामी चैतन्यानंद सरस्वतीला पोलिसांनी अटक केली आहे. स्वामी चैतन्यानंद सरस्वतीच्या मोबाईलमध्ये अनेक फोटो आणि व्हिडीओ पोलिसांना मिळाले आहेत. पोलिसांनी याच प्रकरणात रश्मी, काजल, श्वेता (नावे बदललेली) या चैतन्यानंदच्या तीन सख्ख्या बहि‍णींची चौकशी सुरू केली आहे. 

दिल्ली पोलिसांनी स्वामी चैतन्यानंद सरस्वती याचा मोबाईल जप्त केला. त्यात अश्लील फोटो, अश्लील व्हिडीओ, महिला, मुलींसोबतचे संभाषणही मिळाले आहेत. 

स्वामी चैतन्यानंद सरस्वतीच्या तीन बहि‍णींची चौकशी

पोलीस सूत्रांनी सांगितले की, रश्मी, काजल आणि श्वेता या तीन महिलांची चौकशी सुरू केली आहे. या तिन्ही महिला स्वामी चैतन्यानंद सरस्वतीच्या सख्ख्या बहिणी आहेत. श्वेता नावाची महिला इन्स्टिट्यूटमध्ये डीन आणि इतर दोघी वॉर्डन आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वामी चैतन्यानंद सरस्वती याने इन्स्टिट्यूटमधील महिलांनाही आपल्या वासनेची शिकार बनवलं. काही महिलांसोबतही त्याने संबंध प्रस्थापित केले.

मुलांना हनी ट्रॅपमध्ये अडकवायचा

पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आले आहे की, बाबा मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्यांना दागिने, महागड्या वस्तू, चष्मे भेट द्यायचा. तो काही मुलींना अल्मोडालाही घेऊन गेला होता.   बाबा चैतन्यानंद हा मुलांना हनी ट्रॅपमध्ये अडकवत होता. चैतन्यानंदने एका मुलीला सांगितले होते की, एका मुलासोबतचा अश्लील फोटो मला पाठव. त्याला मिठी मार आणि मला फोटो पाठव. बाबा त्या मुलीच्या माध्यमातून त्या मुलाला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी बाबाने त्या मुलीला पैसे दिले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Swami Chaitanyananda arrested: Sexual exploitation and honey traps exposed, photos found.

Web Summary : Swami Chaitanyananda Saraswati arrested for sexually exploiting students and women. His phone revealed incriminating photos and videos. He allegedly used honey traps, gifting expensive items to lure victims. Police are investigating his sisters, who held positions in the institute.
टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणCrime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिस