शहरं
Join us  
Trending Stories
1
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
3
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
4
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
5
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
6
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
7
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
8
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
9
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
10
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
11
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
12
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
13
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
14
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
15
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
16
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
17
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
18
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
19
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...

Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 09:17 IST

Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला तेव्हा एका व्यक्तीच्या पायालाही गोळी लागली होती.

अजित पवार गटाचे नेते नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला तेव्हा एका व्यक्तीच्या पायालाही गोळी लागली होती. वांद्रे येथील भाभा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हत्या झाली 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?, आरोपींनी कसा गोळीबार केला? याबाबत या व्यक्तीने आता महत्त्वाची माहिती दिली आहे. 

राज कनोजिया असं गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. रुग्णालयामध्ये असलेल्या २२ वर्षीय राज कनोजियाने सांगितलं की, तो टेलरचं काम करतो. घटनेच्या दिवशी दसरा असल्यामुळे तो सायंकाळी पाच वाजताच घरी गेला होता. त्यानंतर तो दुर्गा मातेच्या दर्शनासाठी आला. दर्शन घेतल्यानंतर तो ज्यूस पिऊन घराकडे जात असताना एकच गोंधळ उडाला. दसरा असल्याने फटाकेही फोडले जात होते. तेव्हा राजला वाटलं की, त्याच्याही पायाला फटाक्यामुळे इजा झाली आहे.

राजने पायाकडे पुन्हा पाहिलं असता त्यातून खूप रक्त येत होतं. तिथे उपस्थित लोकांनी राजला लगेचच मंदिराच्या आत नेलं. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने राजला जवळच्या भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिथे त्याच्या पायात गोळी लागल्याचं समोर आलं. याचवेळी राजला बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराचीही माहिती मिळाली. सध्या राजच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 

राजने दिलेल्या माहितीनुसार, तो फेब्रुवारीमध्ये लग्न करणार आहे. अशा स्थितीत इतक्या लवकर स्वत:च्या पायावर पुन्हा नीट उभं राहणं कठीण वाटतं आहे. त्यामुळे त्याने सरकारकडे मदत मागितली आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन शूटर्सनी गोळीबार केला होता, ज्यात त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. तर इतरांच्या शोधात महाराष्ट्रासह अनेक राज्यात छापे टाकले जात आहेत.

१२ ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी वांद्रे येथील झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर लोक फटाके फोडत होते. त्यानंतर रात्री ९.२० च्या दरम्यान बाबा सिद्दिकी त्यांच्या मुलाच्या कार्यालयातून बाहेर आले. फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. तोंडाला रुमाल बांधलेले तीन जण अचानक आले आणि त्यांनी एकापाठोपाठ सहा राऊंड फायर केले. यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांना लागल्या.

गोळी लागताच बाबा सिद्दिकी जमिनीवर कोसळले. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. गुरमेल सिंह, धर्मराज कश्यप आणि शिव कुमार यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला होता. यापैकी धर्मराज आणि गुरमेल यांना ताब्यात घेतलं होतं. तर झिशान, शुभम लोणकर आणि शिव कुमार फरार आहेत. त्यानंतर प्रवीण लोणकरलाही पोलिसांनी अटक केली होती. प्रवीण आणि शुभम हे भाऊ आहेत.

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीNCPराष्ट्रवादी काँग्रेसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस