Baba Siddique : "सलमान खानवर शूटरला करायचा होता हल्ला, पण..."; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 11:39 IST2024-12-05T11:37:12+5:302024-12-05T11:39:15+5:30
Baba Siddique And Salman Khan : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेसमोर रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

Baba Siddique : "सलमान खानवर शूटरला करायचा होता हल्ला, पण..."; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेसमोर रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, चौकशी आणि तथ्यांच्या तपासादरम्यान त्यांना कळालं की, बाबा सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांच्या हिटलिस्टमध्ये झिशान सिद्दिकी यांच्यासोबतच बॉलिवूड अभिनेता सलमान खानचं देखील नाव होतं.
या प्रकरणी गुन्हे शाखेने आतापर्यंत २६ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या चौकशीदरम्यान शूटरला सलमान खानलाही टार्गेट करायचं होतं, असं समोर आलं आहे, मात्र सलमान खानच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे त्यांचा प्लॅन यशस्वी होऊ शकला नाही.
तपासात असंही समोर आलं आहे की, जेव्हा आरोपी सलमान खानवर हल्ला करण्यात अयशस्वी ठरले तेव्हा त्यांनी त्यांचं संपूर्ण लक्ष बाबा सिद्दिकी आणि त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांच्यावर केंद्रित केलं होतं. १२ ऑक्टोबर रोजी ते बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात यशस्वी झाले, परंतु झिशान थोडक्यात वाचले कारण ते हत्येच्या काही मिनिटांपूर्वी त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडले होते.
एका अधिकाऱ्याने सांगितलं की, तपासादरम्यान आम्हाला मिळालेल्या माहितीवरून असं दिसून येतं की, आरोपींनी एकदा सलमान खानच्या घराची रेकी केली होती. त्यानंतर सलमान खानच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचं त्यांनी पाहिलं. याशिवाय सलमान खान त्याच्या कारमध्ये बिल्डिंगमधून बाहेर पडतो, त्यामुळे त्याच्या जवळ जाणं अशक्य असल्याचंही त्याला आढळलं. यानंतर आरोपींनी त्यांचं लक्ष सलमान खानवरून हटवलं आणि बाबा सिद्दिकींवर लक्ष केंद्रित केलं.