Ayesha Banu Makrani Suicide Case : Ayesha's husband asked her to 'die, send a video' before she jumped to death, reveal call records | आयशाचं शेवटचं ७० मिनिटांचं कॉल रेकॉर्डिंग, आरिफ म्हणाला होता - 'तू मर आणि मला व्हिडीओ पाठव'!

आयशाचं शेवटचं ७० मिनिटांचं कॉल रेकॉर्डिंग, आरिफ म्हणाला होता - 'तू मर आणि मला व्हिडीओ पाठव'!

अहमदाबादमधील आयशा आत्महत्या प्रकरणात (Ayesha Banu Makrani suicide case) पोलिसांच्या हाती मोठी माहिती लागली आहे. पोलिसांच्या हाती ७० मिनिटांची ती कॉल रेकॉर्डिंग लागली आहे. ज्यात आत्महत्येपूर्वी आएशा पती आरिफसोबत बोलत होती. असे सांगितले जात आहे की, या रेकॉर्डिंगने अनेक रहस्य समोर येतील.

अहमदाबादच्या(Ahmedabad) साबरमती रिव्हर फ्रंटहून नदीत उडी घेऊन आत्महत्या (Ayesha Suicide Case) करणाऱ्या आयशाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस सतर्क झाले. पोलिसांना या प्रकरणी गुन्हा नोंदवत राजस्थानच्या पालीमधून आयशाचा पती आरिफ याला अटक केली आहे. आऱिफच्या अटकेनंतर पोलीस या प्रकरणाचा वेगवेगळ्या बाजूने तपास करत आहेत.  (हे पण वाचा : आलीशान घर, ४ दुकानं तरीही आरिफनं मागितला हुंडा, वडिलांनीही घरासाठी दिले होते पैसे)

पोलिसांनी आएशाचा पती आऱिफचा मोबाइल ताब्यात घेतला आहे. आयशाच्या परिवारानुसार आयशा आपल्या मोबाइलहून आत्महत्या करण्यापूर्वी आरिफसोबत ७० मिनिटे बोलली होती. ही रेकॉर्डिंग आता पोलिसांच्या हाती लागली आहे. ज्यात आरिफ आयशासोबत बोलताना कथितपणे म्हणाला होता की, तू मर आणि त्याचा व्हिडीओ मला पाठव. (हे पण वाचा : धक्कादायक! सूनेच्या प्रेमात आंधळा झालेल्या सासऱ्याने आपल्या १६ महिन्याच्या मुलाला नदीत फेकलं....)

तेच आयशाच्या कुटुंबियांनी आरोप लावला की, आरिफचं दुसऱ्या तरूणीसोबत अफेअर सुरू होतं. आता पोलीस मोबाइल डेटाच्या माध्यमातून हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे की, आरिफचं अफेअर ज्या तरूणीसोबत होतं ती तरूणी कोण आहे. त्या तरूणीमुळे आरिफ आयशाला त्रास देत होता का? आणि हुंड्याचे पैसे मागत होता का?

आयशाने २०२० मध्ये आरिफ आणि त्याच्या परिवारा विरोधात हुंड्यासाठी त्रास दिला जात असल्याची तक्रार पोलिसात दिली होती. ज्यानंतर पोलिसांनी आरिफ आणि त्याच्या कुटुंबियांना अटकही केली होती. त्यानंतर ते जामिनावर सुटलेही होते. पोलिसांना ७० मिनिटांची जी कॉल रेकॉर्डिंग मिळाली आहे त्यात आयशा आणि आरिफ यांच्यात हुंड्याबाबत बोलणं झालं आणि आरिफ आयशावर अनेकदा कुटुंबियांना त्रास देत असल्याचा आरोप लावत होता. तिच्यावर दबाव टाकत होता की, हुंड्यासंबंधी तक्रार तिने मागे घ्यावी.

सध्या पोलीस आयशाच्या आणि आरिफच्या मोबाइल व्हिडीओ- ऑडिओच्या माध्यमातून काही पुरावे जमा करत आहेत. सोबतच मोबाइलमधील ऑडिओ टेस्टसाठी एफएसएलही पाठवणार आहे. 
 

Web Title: Ayesha Banu Makrani Suicide Case : Ayesha's husband asked her to 'die, send a video' before she jumped to death, reveal call records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.