मिर्झापूरमध्ये अ‍ॅक्सिस बँकेच्या व्हॅनवर दरोडा; कॅशिअर, गार्डवर गोळ्या झाडल्या, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 15:14 IST2023-09-12T15:11:09+5:302023-09-12T15:14:04+5:30

दरोडेखोर दुचाकीवरून आले होते. त्यांचा फोटो तेथील इमारतीमध्ये राहणाऱ्यांनी काढला आहे.

Axis Bank van robbed in Mirzapur; Cashiers, guards shot at, one dead UP Crime news | मिर्झापूरमध्ये अ‍ॅक्सिस बँकेच्या व्हॅनवर दरोडा; कॅशिअर, गार्डवर गोळ्या झाडल्या, एकाचा मृत्यू

मिर्झापूरमध्ये अ‍ॅक्सिस बँकेच्या व्हॅनवर दरोडा; कॅशिअर, गार्डवर गोळ्या झाडल्या, एकाचा मृत्यू

मिर्झापूरमध्ये आज अ‍ॅक्सिस बँकेच्या कॅश व्हॅनवर रक्तरंजित दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी बँकेच्या गार्ड, कॅशिअरसोबत तीन जणांना गोळ्या मारल्या आहेत. यामध्ये गार्डचा मृत्यू झाला असून कॅश व्हॅनमधील पैसे घेऊन दरोडेखोर पळून गेले आहेत. त्यांनी जवळपास २२ लाखांची कॅश नेली आहे. 

दरोडेखोर दुचाकीवरून आले होते. त्यांचा फोटो तेथील इमारतीमध्ये राहणाऱ्यांनी काढला आहे. दोघांनी हेल्मेट घातले होते व त्यांच्या हातात पिस्तूल होती. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून तपास सुरु करण्यात आला आहे. 

२०२१ मध्य़ेही अशाप्रकारचा दरोडा पडला होता. तेव्हा ५० लाख रुपये घेऊन दरोडेखोर पळाले होते. तरी देखील पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त वाढविला नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. 

Web Title: Axis Bank van robbed in Mirzapur; Cashiers, guards shot at, one dead UP Crime news