शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! फिरायला नेण्याचा बहाण्याने दिरानेच केला वहिनीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 19:08 IST

Sexual Abuse : याबाबात पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार दिली आहे.

झारखंड - फिरायला नेण्याच्या बहाण्याने आपल्याला वहिनीवरच बलात्कार केल्याची लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. झारखंडमधील रांची  येथील महिलेच्या बाबतीत हा प्रकार घडला असून याबाबात पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार दिली आहे.

बाहेर फिरायला नेण्याच्या बहाणा करून पीडित महिलेला तिच्या दिराने पाटणा आणि दिल्लीला घेऊन गेला. दिल्लीत त्याने एका भाड्याच्या खोलीत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने त्या महिलेला कोलकात्याताला घेवून गेला. झालेल्या प्रकाराची वाच्यता केल्यास पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्याने रांची रेल्वे स्थानकावर तिला सोडून पळ काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

पीडित महिलेने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशियताचे महिलेच्या घरी ये-जा होती. २८ मार्च रोजी संशियताने ३ वाजता भेटायला बोलावले. त्याने टॅक्सी बुक केली आणि फिरायला जाऊया असे सांगून घेवून गेला. पीडितेने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबत फिरायला गेली. मात्र, काही अंतर कापल्यावर गाडीतून उतरवून बसमध्ये बसवले आणि नंतर पाटण्याला घेऊन गेला. पाटण्याहून ट्रेनने दिल्लीला आणले. येथे त्याने भाड्याचे घर घेतले. त्याठिकाणी त्याने २ दिवस तिच्यावर बलात्कार केला.

२ दिवस कोलकाता हॉटेलमध्ये डांबून तिच्यावर बलात्कार केला. तिने घरी जाण्यावर अडून बसल्यावर ४ एप्रिलला तिला ट्रेनने रांचीला नेले. रांची स्टेशनवर पोहचताच त्याने संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर त्याने पीडितेला रांची रेल्वे स्टेशनवर सोडून पळ काढला. पीडित महिला घरी पोहोचताच तिने पतीला घटनेची संपूर्ण माहिती दिली. यानंतर पोलिसात तक्रार तिने दाखल केली.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसJharkhandझारखंडArrestअटक