नागपुरातील दिघोरी नाका रोडवर ऑटो चालकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 23:32 IST2019-12-14T23:31:17+5:302019-12-14T23:32:26+5:30
दिघोरी नाका रोड येथील एका दारूभट्टीजवळ झालेल्या मारहाणीनंतर एका ३० वर्षीय ऑटो चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

नागपुरातील दिघोरी नाका रोडवर ऑटो चालकाची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिघोरी नाका रोड येथील एका दारूभट्टीजवळ झालेल्या मारहाणीनंतर एका ३० वर्षीय ऑटो चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. इरफान ऊर्फ इप्पू पठाण रा. राऊतनगर असे मृताचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी २ वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार इप्पू दुपारी दिघोरी नाक्याजवळील दारूभट्टीजवळ थांबला होता. तिथे त्याचा काही लोकांसोबत वाद झाला. दुकानाच्या आतच इप्पूला मारहाण करण्यात आली. यानंतर तो घरी गेला. परंतु मुका मार बसल्याने त्याची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. माहिती मिळताच हुडकेश्वर व अजनी पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथकही पोहोचले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा तपास सुरू होता.