शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत तरुणाचं डोकं ठेचून खून, पोलिसांची घटनास्थळी धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 10:13 IST

दरम्यान तेथील एका गॅरेज चालकाने ही बाब महेशचे वडील दिगंबर काकडे यांना फोन करून कळविली. त्यानंतर काकडे हे हॉटेल तरंग येथे गेले

ठळक मुद्देमहेशने महिनाभरापूर्वीच काम सोडले आणि तो कंपनीत कामाला जाऊ लागला होता. शनिवारी त्याला वेतन मिळाले होते, तो आणि त्याचा तरंग हॉटेलमध्ये वेटर असलेला मित्र राहुल देविदास बेडके यांनी दिवसभर दारू पिली.

औरंगाबाद : कांचनावाडी परिसरातील नक्षत्रापार्क येथे एका 18 वर्षाच्या तरुणाचे डोकं ठेचून त्याचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली. याघटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महेश दिगंबर काकडे (वय-18 ,रा नक्षत्रापार्क) असे मयताचे नाव. महेश हा गेल्या काही महिन्यांपूर्वी कांचनवाडीयेथील हॉटेल तरंगमध्ये वेटर म्हणून कामाला होता. 

महेशने महिनाभरापूर्वीच काम सोडले आणि तो कंपनीत कामाला जाऊ लागला होता. शनिवारी त्याला वेतन मिळाले होते, तो आणि त्याचा तरंग हॉटेलमध्ये वेटर असलेला मित्र राहुल देविदास बेडके यांनी दिवसभर दारू पिली. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्यामध्ये काहीतरी कारणावरून भांडण झाले. यातूनच त्यांच्यामध्ये हाणामारी झाली. यावेळी गंभीर जखमी झालेल्या महेशला सोडून राहुल हॉटेलमध्ये कामावर परतला. 

दरम्यान तेथील एका गॅरेज चालकाने ही बाब महेशचे वडील दिगंबर काकडे यांना फोन करून कळविली. त्यानंतर काकडे हे हॉटेल तरंग येथे गेले. तेथे त्यांनी महेश कुठे अशी राहुलकडे विचारणा केली असता महेश परिसरातील एका ठिकाणी झोपला असल्याचे तो म्हणाला. त्यानंतर हॉटेल चालक गणेशशेठ आणि दिगंबर काकडे यांनी राहुलला सोबत घेऊन ते महेश झोपलेल्या ठिकाणी गेले, तेव्हा महेश रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला होता. त्यांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले असता रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घाटी रुग्णालय आणि घटनास्थळी धाव घेतली. महेशचा खून कोणी आणि कोणत्या शस्त्राने केला? खुनाचे कारण? काय याबाबतची माहिती रात्री उशिरापर्यंत समोर आली नव्हती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस