अबब! मुलाला मारण्यासाठी अनोखा कट; खेळण्यातील गाडीत ठेवले स्फोटकं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 15:14 IST2018-10-18T15:14:00+5:302018-10-18T15:14:20+5:30
वरिष्ठ पोलिसांसह बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाची (बीडीएस) टीम घटनास्थळी दाखल झाली. हा स्फोट कुणी घडवला आणि स्फोट घडवण्यामागे त्या व्यक्तीचा काय हेतू होता, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

अबब! मुलाला मारण्यासाठी अनोखा कट; खेळण्यातील गाडीत ठेवले स्फोटकं
बडनगर (मध्य प्रदेश) - अज्ञात व्यक्ती एका लहान मुलाकडे खेळण्यातील गाडी देऊन गेला. लहान मुलाला ते खेळणं आवडलं. संबंधित मुलानेही मोठ्या आवडीने ते खेळणं खेळण्यासाठी घेतलं. मात्र, त्यानंतर काही क्षणांतच या गाडीचा स्फोट झाला. या स्फोटात लहानग्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. अज्ञात व्यक्तीने ठेवलेल्या खेळण्यातील गाडीचा स्फोट होऊन एका मुलाला गंभीर जखम झाली आहे. मध्यप्रदेशच्या बडनगरमध्ये आज सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला. दरम्यान, या दुर्घटनेच्या ठिकाणी पोलिसांना काही स्फोटकं देखील मिळाली आहेत. वरिष्ठ पोलिसांसह बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाची (बीडीएस) टीम घटनास्थळी दाखल झाली. हा स्फोट कुणी घडवला आणि स्फोट घडवण्यामागे त्या व्यक्तीचा काय हेतू होता, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.