तोंडात बोळा कोंबून हातपाय बांधायचा प्रयत्न; महिला डॉक्टरने धाडस दाखवत चोरांशी केले दोन हात 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 07:05 PM2021-06-01T19:05:55+5:302021-06-01T20:27:56+5:30

The female doctor showed courage : दोन चोरांशी केली एकाकी झुंज अन् एका चोराला पकडले तर एक फरार

Attempts to tie limbs in the mouth; The female doctor showed courage and successfully battle with the thieves | तोंडात बोळा कोंबून हातपाय बांधायचा प्रयत्न; महिला डॉक्टरने धाडस दाखवत चोरांशी केले दोन हात 

तोंडात बोळा कोंबून हातपाय बांधायचा प्रयत्न; महिला डॉक्टरने धाडस दाखवत चोरांशी केले दोन हात 

Next
ठळक मुद्देडॉक्टर शितल आल्हाट (३५) असे या धाडसी महिलेचे नाव आहे. ती मुंबई चेंबूरची रहिवासी आहेअधिक माहिती नुसार, मुंबई चेंबूर येथे राहणारी डॉक्टर महिला ही सध्या नालासोपारा येथील मैत्रिणीच्या घरी आली आहे.

वसई  - मुंबईतील महिला डॉक्टर नालासोपारा येथील तात्पुरत्या वास्तव्यास आली असताना रविवारी तिच्या राहत्या घरात शिरलेल्या दोन चोरांशी तिने एकाकी झुंज दिल्याची घटना घडली आहे. नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर येथे रविवार दि 30 मे रोजीच्या पहाटे वेळी ही घटना घडली आहे. दरम्यान त्या महिला डॉक्टरने दाखवलेल्या धाडसामुळे चोरांचा प्रयत्न जरी फसला असला तरी यापैकी एका आरोपीला नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे. डॉक्टर शितल आल्हाट (३५) असे या धाडसी महिलेचे नाव आहे. ती मुंबई चेंबूरची रहिवासी आहे

अधिक माहिती नुसार, मुंबई चेंबूर येथे राहणारी डॉक्टर महिला ही सध्या नालासोपारा येथील मैत्रिणीच्या घरी आली आहे. त्यांच्या घराच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे त्या पंधरा दिवसापूर्वी नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर येथील साई लक्ष्मी बिल्डिंग येथील मैत्रिणीच्या रिकाम्या घरी राहण्यासाठी आल्या होत्या.  तीन महिने त्या या घरात राहणार होत्या. त्यांचे पती हे कामानिमित्त बाहेरगावी असून त्यांची दोन्ही मुले ही आजोळी अहमदनगर येथे गेली होती. 


रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांना अचानक आवाजाने जाग आली, त्यांच्या समोर दोन तरुण हातात सुरा घेऊन उभे होते.  त्याचवेळी हॉलमधील खिडकीची काच सरकवून ते घरात शिरले होते. त्यातील एकाने डॉक्टर शीतल यांच्या तोंडात बोळा कोंबून गप्प राहण्यास सांगितले. तर दुसऱ्या चोराने त्या डॉक्टर महिलेचे हात बांधायचा प्रयत्न केला. मात्र त्या परिस्थितीतही प्रसंगावधान दाखवत त्यांनी दोन्ही चोरांना झुंज देत प्रतिकार केला. अचानकपणे घडलेल्या या झटापटीत ते दोन्ही चोर गोंधळले आणि डॉ. शीतल यांनी सर्वत्र मदतीचा धावा केला खरा मात्र या सर्व गोंधळात ते दोन्ही चोर मुख्य दारातून पळून जाण्यात यशस्वी झाले. परिणामी चोरांनी चक्क जाताना घरातून जास्त काही नाही. मात्र, डॉक्टर शीतल यांचा मोबाईल आणि 5 हजार रुपये घेऊन पोबारा केला.



...आणि एक चोर त्याच बिल्डिंगमधला ; ओळख पटली
विशेष म्हणजे डॉक्टर शीतल यांच्या घरात दोघे चोर शिरले होते. आश्चर्य म्हणजे एक चोर हुसेन शेख  हा त्याच इमारतीत राहतो.या चोराला डॉक्टर शीतल यांनी ओळखले होते.  या प्रकरणी  नालासोपारा पोलीसांनी आरोपी चोरावर गुन्हा दाखल करून आरोपी हुसेन शेख याला अटक केली आहे, तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली. 

Web Title: Attempts to tie limbs in the mouth; The female doctor showed courage and successfully battle with the thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.