जळती चिता विझवून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला; सत्य समोर येताच सगळेच हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 20:46 IST2023-06-16T20:45:12+5:302023-06-16T20:46:12+5:30

पोलीस जेव्हा स्मशानभूमीत पोहचले तेव्हा जळती चिता विझवून महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला.

Attempting to burn the body of a woman by killing her, the accused husband was taken into custody by the police | जळती चिता विझवून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला; सत्य समोर येताच सगळेच हादरले

जळती चिता विझवून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला; सत्य समोर येताच सगळेच हादरले

बल्लमगड - फरिदाबादच्या जवळील बल्लमगड येथील आदर्श कॉलनी हृदयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी एका विवाहित महिलेची हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर पती मृत पत्नीचा मृतदेह घेऊन स्मशानभूमीत गेला. तिथे पत्नीवर अंत्यसंस्कार करू लागला परंतु या घटनेची माहिती पत्नीच्या कुटुंबालाही दिली नाही. शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती देताच तात्काळ पोलिसांनी स्मशानभूमीत धाव घेतली. 

पोलीस जेव्हा स्मशानभूमीत पोहचले तेव्हा जळती चिता विझवून महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी या घटनेचा तपास केला तेव्हा मृत महिलेने २ लग्न केल्याचे समोर आले. पहिल्या पतीचे नाव रवी होते ज्याला तिने तलाक दिला होता. त्यानंतर कृष्णा नावाच्या युवकासोबत महिलेने दुसरे लग्न केले. मृत महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पती कृष्णाला अटक केली. 

मृत महिलेचे वडील विजेंदर यांनी सांगितले की, माझी मुलगी सविता हिचे २०१५ मध्ये रवीसोबत लग्न झाले होते. आदर्श नगरमध्येच राहणारा कृष्णा हा सविताच्या घरी येऊन जात असे. त्यावेळी कृष्णाने सविताला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. २०१८ मध्ये पहिला पती रवीला घटस्फोट देऊन सविताने कृष्णाशी लग्न केले. परंतु दोघांमध्ये वारंवार वाद होत असे. कृष्णा हा सविताला मारहाण करायचा असा आरोप वडिलांनी केला. 

सवितानं केले होते दुसरं लग्न
कृष्णानेच माझी मुलगी सविता हिचा खून केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी लावला. महिलेची हत्या करून पतीने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. संबंधित घटनेबाबत पोलिसांनी मृत सविताच्या कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांसह ते स्मशानभूमीला पोहचले त्याठिकाणी कृष्णा सविताच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करत होता. पोलिसांनी चितेची आग विझवून मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठवला. आरोपी कृष्णाला फाशी द्या अशी मागणी मृत महिलेच्या वडिलांनी केली. 

या प्रकरणी पोलीस अधिकारी कुलदीप सिंह म्हणाले की, एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला असून तिचा पती कुटुंबाला न कळवता मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन गेलाय अशी सूचना मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी जळती चिता विझवून मृतदेह ताब्यात घेतला. सध्या या प्रकरणात आरोपी पती कृष्णाला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली. 

Web Title: Attempting to burn the body of a woman by killing her, the accused husband was taken into custody by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.