प्रियकराने धमकावल्याने प्रेयसीने केला आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 14:16 IST2020-08-01T14:13:13+5:302020-08-01T14:16:13+5:30

भाईंदर पश्चिमेस राहणाऱ्या 19 वर्षाच्या तरुणीचे शेजारी राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणासोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तरुणी अल्पवयीन होती आणि तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध व शारीरिक संबंध ठेवले.

Attempted suicide by girlfriend after being threatened by boyfriend | प्रियकराने धमकावल्याने प्रेयसीने केला आत्महत्येचा प्रयत्न

प्रियकराने धमकावल्याने प्रेयसीने केला आत्महत्येचा प्रयत्न

ठळक मुद्देभाईंदर पोलिसांनी प्रियकरा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मीरा रोडच्या इंदिरा गांधी पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आहे.

मीरारोड - लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या प्रियकराने पोलिसात तक्रार केल्यास सोडणार नाही असे धमकावल्याने प्रेयसीने घरातील फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. भाईंदर पोलिसांनी प्रियकरा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भाईंदर पश्चिमेस राहणाऱ्या 19 वर्षाच्या तरुणीचे शेजारी राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणासोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तरुणी अल्पवयीन होती आणि तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध व शारीरिक संबंध ठेवले.  सदर तरुणाने दोन वर्षा पूर्वी दुसऱ्या तरुणीशी लग्न केले. परंतु तरुणाने सदर तरुणीशी प्रेमसंबंध सुरूच ठेवले . 


25 जुलै रोजी रात्री दोघेही बोरिवलीच्या एका लॉजमध्ये गेले. तिकडून दुसऱ्या दिवशी परत आले. परंतु तरुणीच्या वडिलांनी मुलगी हरवल्याची तक्रार भाईंदर पोलीस ठाण्यात दिली असल्याने 30 जुलै रोजी तिने भाईंदर पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला.  त्यावरून तरुणाने तिला पोलीस ठाण्यात तक्रार केली तर सोडणार नाही असे धमकावले. त्यामुळे तरुणीने मध्यरात्रीच्या सुमारास घरातच फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला मीरा रोडच्या इंदिरा गांधी पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी

 

मेट्रो रेल्वे प्रशासनात खळबळ, महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक देश-विदेशात केले गेले कॉल 

 

तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्... 

 

रियाच्या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी आमचं ऐकावं, सुशांतच्या कुटुंबीयांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

 

वेश्याव्यवसाय प्रकरणी कोलव्यात मध्यप्रदेशातील एकजण जेरबंद

Web Title: Attempted suicide by girlfriend after being threatened by boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.