पोटच्या नऊ वर्षीय  मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, नराधम बापाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 03:53 PM2020-10-02T15:53:35+5:302020-10-02T15:55:21+5:30

Sexual Harrasement : क्षयरोगाची लागण झाल्याने  पिडीत मुलीची आई आपल्या तीन मुलींसमवेत वसाहतीत बाजुला घर असलेल्या तीच्या आईकडे राहते.

Attempted sexual assault on own nine-year-old daughter, father arrested | पोटच्या नऊ वर्षीय  मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, नराधम बापाला अटक

पोटच्या नऊ वर्षीय  मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, नराधम बापाला अटक

Next
ठळक मुद्देबाप हा त्याच्या घरात दुपारी झोपला असताना पिडीत मुलगी त्याठिकाणी खेळायला आली होती. त्यावेळी त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

डोंबिवली - पोटच्या नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणा-या नराधम बापाला रामनगर पोलीसांनी अटक केली आहे. ही घटना गुरूवारी दुपारी 2 वाजता डोंबिवली पुर्वेकडील पाथर्ली, शेलार नाका परिसरातील त्रिमुर्ती वसाहतीत घडली. क्षयरोगाची लागण झाल्याने  पिडीत मुलीची आई आपल्या तीन मुलींसमवेत वसाहतीत बाजुला घर असलेल्या तीच्या आईकडे राहते.

बाप हा त्याच्या घरात दुपारी झोपला असताना पिडीत मुलगी त्याठिकाणी खेळायला आली होती. त्यावेळी त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितला. तीने लागलीच रामनगर पोलीस ठाणे गाठत नव-याविरोधात तक्रार केली. आईने दिलेल्या तक्रारीवरून पिडीत मुलीच्या बापावर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केल्याची माहीती वरीष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश आहेर यांनी दिली. आरोपीला दुपारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Web Title: Attempted sexual assault on own nine-year-old daughter, father arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app