शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

6 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, प्लंबरला 6 वर्षाचा कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 19:08 IST

Pocso Case : गोविंद जाधव याला कल्याण येथील विशेष पोक्सो न्यायालयाने शुक्रवारी ६ वर्षे ११ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

कल्याण: सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गोविंद जाधव याला कल्याण येथील विशेष पोक्सो न्यायालयाने शुक्रवारी ६ वर्षे ११ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. दरम्यान त्याची ३७७ कलमान्वये दाखल असलेल्या आरोपातून निर्दाेष मुक्तता झाली आहे.

व्यवसायाने प्लंबर असलेल्या गोविंदने त्याच्या जवळच्या नातेवाईकाच्या सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा मे २०१५ मध्ये बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीवरून नोंदविण्यात आला होता. विनयभंग आणि अनैसर्गिक अत्याचाराच्या आरोपाखाली त्याला पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून तो  कल्याणच्या आधारवाडी कारागृहात होता. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरीष्ठ पोलिस निरिक्षक दिलीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक एफ.एम शेख यांनी तपास करून गुन्हयाचे दोषारोपपत्र पोक्सो न्यायालयात दाखल केले होते.

सरकारी पक्षाच्या वतीने वकील अश्विनी भामरे पाटील यांनी तर बचाव पक्षाच्या वतीने वकील आलिम शेख आणि तृप्ती पाटील यांनी न्यायालयात बाजू मांडली.  न्यायालयात सादर करण्यात आलेले साक्षीदार, पुरावे या आधारे आरोपी जाधवला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रय} केल्याच्या गुन्हयात सहा वर्षे ११ महिन्याची कारावासाची शिक्षा पोक्सो न्यायालयाच्या न्या. संगीता पहाडे यांनी ठोठावली. मात्र अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा न्यायालयात सिध्द होऊ शकला नाही.

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसCourtन्यायालयkalyanकल्याण