शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

निवडणुकीतील पराभवाने निराश झालेल्या सपा नेत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 21:14 IST

Self Immolation : राज्यात पुन्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्याने दु:खी आणि हताश होऊन हे पाऊल उचलण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

कानपूरमधील सपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र सिंह उर्फ ​​पिंटू यांनी गुरुवारी दुपारी विधानभवनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. आत्मदहनासाठी आग लावताच पोलिसांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात पुन्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्याने दु:खी आणि हताश होऊन हे पाऊल उचलण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.एसीपी हजरतगंज अखिलेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूर नगरचे ज्येष्ठ सपा नेते नरेंद्र सिंह उर्फ ​​पिंटू चारच्या सुमारास विधान भवनासमोर पोहोचले. अचानक त्यांनी स्वतःवर तेल ओतले. त्यानंतर स्वतःला पेटवून घेतले. दरम्यान, पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. जिथे उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 टक्के भाजल्याचं डॉक्टर बोलत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र कानपूरमध्ये सपाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. रूग्णालयात जाताना ओरडत होते की भाजपने पुन्हा सरकार स्थापन केल्याने मला दु:ख झाले आहे.

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज गुरुवारी होत होती. यादरम्यान भाजपचे पुन्हा सरकार स्थापनेचे ट्रेंड येऊ लागले. त्यानंतर पोलिसांनी भाजप कार्यालय आणि विधानभवनाभोवती बंदोबस्त वाढवला होता. त्याचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने पोलिसांच्या उपस्थितीत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२Samajwadi Partyसमाजवादी पार्टीPoliceपोलिस