कल्याणमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न, आरोपीला ठोकल्या बेड्या
By मुरलीधर भवार | Updated: August 2, 2023 23:23 IST2023-08-02T23:22:54+5:302023-08-02T23:23:28+5:30
याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी विशाल अभिमान गवळी याला बेड्या ठोकल्यात आहेत.

कल्याणमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न, आरोपीला ठोकल्या बेड्या
कल्याण : कल्याण पूर्व येथील लोकग्राम परिसरातून एक अल्पवयीन विद्यार्थिनी आज सायंकाळी घरी परतत असताना तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी विशाल अभिमान गवळी याला बेड्या ठोकल्यात आहेत. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज सायंकाळी एक अल्पवयीन विद्यार्थिनी तिचा क्लास आटोपून घरी परतत होती. यावेळी विशाल याने तिचा पाठलाग केला आणि तिचे तोंड दाबून तिला खाली पाडले. तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. अल्पवयीन विद्यार्थिनींना त्याला प्रतिकार केला आणि त्याच्या तावडीतून ती निसटली. तिच्यासह तिच्या पालकांनी कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेतली.
तातडीने लोक ग्राम परिसर गाठून आरोपी विशाल गवळी याच्या मुसक्या आवळल्या. त्याला अटक करून पोलीस ठाण्यात आणले असता त्याने केलेल्या कृत्याविषयी जरा देखील पश्चाताप न करता दोन बोटे उंचावून विजयाची खून दाखवली. यावरून त्याला किती माज आहे, हे पोलिसांसमोर उघड झाले. विशाल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.