बोटाला चावा घेऊन त्यानं पळ काढला; अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा प्रयत्न फसला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 08:34 PM2020-07-23T20:34:59+5:302020-07-23T20:36:22+5:30

पोलिसांनी त्या तरूणाला तुरूंगात पाठविले. मंगळवारी रात्री पालक घराच्या गच्चीवर झोपलेले होते.

Attempted rape of a minor girl, ... so he bit his finger and ran away | बोटाला चावा घेऊन त्यानं पळ काढला; अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा प्रयत्न फसला

बोटाला चावा घेऊन त्यानं पळ काढला; अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा प्रयत्न फसला

googlenewsNext
ठळक मुद्देअल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे.आरोपी संजयचा डाव फसला आणि त्याने मुलीच्या बोटाचा चावा घेतला.

चित्रकूट जिल्ह्यातील मऊ पोलिस स्टेशन परिसरातील एका गावात एका तरूणाने अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. बलात्काराचा प्रयत्न फसल्याने तिच्या बोटाचा चव घेऊन मारहाण करून आरोपी घरातून पळून गेला. अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी त्या तरूणाला तुरूंगात पाठविले. मंगळवारी रात्री पालक घराच्या गच्चीवर झोपलेले होते. तर अल्पवयीन मुलगी खाली एका खोलीत झोपली होती. दरम्यान, गावातील संजय कुमार घरात शिरला. तो तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान मुलीने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला. त्यावर आरोपी संजयचा डाव फसला आणि त्याने मुलीच्या बोटाचा चावा घेतला. तिला मारहाणही केली. मुलीचा आरडाओरडा ऐकून पालक छतावरून खाली आले. तोपर्यंत आरोपी मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन पळून गेला.


बुधवारी सकाळी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. स्टेशन प्रभारी सुभाष चौरसिया म्हणाले की, आरोपीविरोधात विनयभंग आणि प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. आता त्याला तुरूंगात पाठविण्यात आले.'

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

वकिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

 

...अन् फेसबुक फ्रेंडनं महिलेला घातला थोडा थोडका नव्हे, तर ११ लाखांचा गंडा

 

मनोरुग्ण तरुणीवर कारमध्ये अत्याचार; विवस्त्रवस्थेत आढळून आली पीडित तरुणी

 

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी

 

विकास दुबेला जामीन कसा मिळाला हा मुख्य मुद्दा; सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला फटकारलं

 

कोर्टाचा दणका! राजा मान सिंग फेक चकमकप्रकरणी ११ पोलिसांनी जन्मठेपेची शिक्षा 

 

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या सोनू पंजाबनला कोर्टाने सुनावली २४ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

 

CoronaVirus News : सांगलीत उपनिरीक्षकासह सहा पोलिसांना कोरोनाची लागण

 

बस वाहकास मारहाण प्रकरणात रिक्षा चालकाला शिक्षा

Web Title: Attempted rape of a minor girl, ... so he bit his finger and ran away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.