मेडिकल स्टोअरसाठी बोगस परवाना देणारी टोळी अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 03:12 PM2019-02-22T15:12:07+5:302019-02-22T15:15:40+5:30

सहा आरोपींना २६ फेब्रुवारीपर्य़ंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच पोलीस याबाब अधिक तपास करत आहे. 

Attempted bogus licensing gang for medical store | मेडिकल स्टोअरसाठी बोगस परवाना देणारी टोळी अटकेत 

मेडिकल स्टोअरसाठी बोगस परवाना देणारी टोळी अटकेत 

Next
ठळक मुद्देअटक करण्यात आलेले आरोपी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे गेल्या कित्येक दिवसांपासून नवी मुंबई, ठाणे, मुलुंड, भिवंडी या शहरात औषध विक्रीचा व्यवसाय करत होते. . ही टोळी महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये देखील कार्यरत असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. 

ठाणे - औषध विक्रीच्या दुकानासाठी (मेडिकल स्टोअर) बोगस परवाना देणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हा शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारावाईत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. नरेंद्र गेहलोत, हरिशंकर जोशी, दीपक विश्वकर्मा, प्रेमचंद चौधरी, प्रवीण गड्डा आणि महेंद्र भानूशाली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या सहा आरोपींना २६ फेब्रुवारीपर्य़ंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच पोलीस याबाब अधिक तपास करत आहे. 

अटक करण्यात आलेले आरोपी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे गेल्या कित्येक दिवसांपासून नवी मुंबई, ठाणे, मुलुंड, भिवंडी या शहरात औषध विक्रीचा व्यवसाय करत होते. या कारवाईत वैद्यकीय प्रमाणपत्रांसह दहावी-बारवीचे बनावट प्रमाणपत्र देखील आढळून आले आहेत. ही टोळी महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये देखील कार्यरत असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. 

Web Title: Attempted bogus licensing gang for medical store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.