महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 17:57 IST2025-06-18T17:57:07+5:302025-06-18T17:57:39+5:30

महापालिका निवडणूकीचे वारे वाहत असताना ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याला कुटुंबासह जीवेठार मारण्याचा प्रयत्न झाल्याने, शहरांत एकच खळबळ उडाली.

Attempt to set fire to Thackeray Sena office bearer's house in Ulhasnagar by pouring petrol | महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न

महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : ठाकरेसेनेचे शिवसैनिक विजय डावारे यांच्या घरावर पेट्रोल ओतून आग लावण्याचा प्रयत्न मंगळवारी पहाटे ५ वाजता झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 उल्हासनगर कॅम्प नं-४, भीम कॉलनी परिसरातील ठाकरेसेनेचे पदाधिकारी विजय डावारे हे कुटुंबासह घरात झोपले असताना, घराच्या दरवाजाची कडी बाहेरून लावून घरावर पेट्रोल ओतून आग लावण्याचा प्रयत्न मंगळवारी पहाटे ५ वाजता घडला. घराच्या दरवाज्याला आग लागून धुराचे लोट घरात व परिसरात पसरले होते. डावारे यांना जागा आल्यावर त्यांनी जीवाच्या आकांताने आराडाओरड केल्यावर, जागे झालेल्या शेजारी मदतीसाठी धावले. आगीवर पाणी ओतून आग बुजाविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. विजय डावारे यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेना ठाकरेसेनेत कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. ते स्वतः याच प्रभागातून महापालिका निवडणूकसाठी इच्छुक आहेत.

 महापालिका निवडणूकीचे वारे वाहत असताना ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याला कुटुंबासह जीवेठार मारण्याचा प्रयत्न झाल्याने, शहरांत एकच खळबळ उडाली. विरोधकांनी माझ्यासह कुटुंबाला संपविन्याचा प्रयत्न केल्याचा आरोप डावारे यांनी केला. तर पोलिसांनी याचा शोध घेण्याची मागणी ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना केली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी डावारे यांच्या घराची पाहणी केली असून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. असी माहिती पडवळ यांनी पत्रकारांना दिली. जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी पोलिसांना केली आहे.

Web Title: Attempt to set fire to Thackeray Sena office bearer's house in Ulhasnagar by pouring petrol