बालिकेवर अत्याचाराचा फेरीवाल्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 00:20 IST2019-05-09T00:19:55+5:302019-05-09T00:20:07+5:30
वसई पूर्वेस 6 वर्षीय बालिकेवर एका फेरीवाल्याने अमानुष अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकिस आली आहे.

बालिकेवर अत्याचाराचा फेरीवाल्याचा प्रयत्न
वसई - वसई पूर्वेस 6 वर्षीय बालिकेवर एका फेरीवाल्याने अमानुष अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकिस आली आहे.
पोलिसांनी त्या बालिकेच्या पालकांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपी रईसुल खान विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
वसई पूर्व तुंगारफाटा येथे चप्पल विक्र ीचा व्यवसाय करणार्या इसमाची 6 वर्षीय मुलगी चॉकलेट विकत घेण्यासाठी दुकानाकडे निघाली होती.त्याच दरम्यान त्या भागात फळ विक्री करणाऱ्या रईसुल खान याच्याशी तिची गाठ पडली असता त्याने तिला आंबे देण्याचे आमिष दाखवून नजीकच्या एका गाळयात नेले.
आणि अमानुष अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा करून सुटका करून घेतली. त्यानंतर घडलेला प्रकार तिने आपल्या आईला सांगितला. मुलीच्या पालंकानी हि हकीगत वालीव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना कथन केल्यावर पोलिसांनी आरोपी खान याच्याविरोधात कलम 354 ब, 509 आणि बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण अधिनियम 8 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.