शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

इंदापूर तालुक्यात पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोड्याचा प्रयत्न फसला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 17:34 IST

इंदापुर तालुक्यातील भवानीनगर येथे सराफी दुकानावर गुरूवारी (दि.२५ ) मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला.मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे दुकानावर दरोडयाचा प्रयत्न फसला.

ठळक मुद्दे याप्रकरणी पाठलाग करून तीन जण ताब्यात आठ किलो सहाशे छप्पन ग्रॅम चांदीचे सुमारे तीन लाख पंचेचाळीस हजार किंमतीचे दागिने जप्त

बारामती : इंदापुर तालुक्यातील भवानीनगर येथे सराफी दुकानावर गुरूवारी (दि.२५ ) मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला.मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे दुकानावर दरोडयाचा प्रयत्न फसला.अवघे काही तोळे सोने लंपास करण्यात दरोडेखोरांना यश आले. दरोडा टाकला असतानाच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यामुळे दरोडेखोरांनी फरार होण्याचा प्रयत्न केला.परंतु,पोलिसांनी पाठलाग करून तिघा जणांना पकडले. याप्रकरणी पकडण्यात आलेल्या आरोपींचे नावे शौकत शेख, शमीम शेख ,अजिजुर शेख (तिघेही रा.झारखंड )असे आहेत.या दरोड्याच्या मुख्य सूत्रधार मगनू शेख, दिलू शेख (रा.पश्चिम बंगाल) दोघे असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच पाच जण आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दरोडेखोरानी दहा ते बारा तोळे सोने लंपास करण्यात इतर साथीदार यशस्वी झाले. गुरूवारी मध्यरात्री एक ते तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. घटनेनंतर काहीवेळातच उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेथील सीसी फुटेजच्या माध्यमातून घटनाक्रम जाणुन घेण्याचा प्रयत्न केला. या बाबत पत्रकारांशी बोलताना शिरगांवकर म्हणाले की या घटनेत आठ जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे सर्व जण पिकअप गाडी घेऊन दरोडा टाकण्यासाठी आले होते. दुकानाच्या मागील बाजूचे दोन शटर गॅस कटरने कापून दरोडेखोरानी दुकानात प्रवेश केला. यावेळी दुकानांतील शोकेसमध्ये असणारे आठ किलो सहाशे छप्पन ग्रॅम चांदीचे सुमारे तीन लाख पंचेचाळीस हजार किंमतीचे दागिने घेवून जात असताना पोलिसांना मिळून आले आहेत. मात्र, तिजोरीतील दहा ते बारा तोळे सोने लंपास करण्यात आल्याचा अंदाज आहे.  गस्तीवर असलेल्या पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्या तत्परतेने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बाहेर थांबलेल्या इतर साथीदारांनी दुकानातील इतर साथीदारांना पोलीस आल्याची माहिती दिली. त्या मुळे दरोडा अर्ध्यावर सोडून दरोडेखोरानी पळ काढला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे पोलीस कर्मचारी भानुदास जगदाळे,रूपेश नावाडकर,होमगाडॅ विठठल चव्हाण,आश्विन बनसोडे यांनी पाठलाग करून पळून जाणाºया तिघा जणांना पकडले .

टॅग्स :IndapurइंदापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसjewelleryदागिनेArrestअटकBaramatiबारामती