जुन्या भांडणावरुन गुंडाकडून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 04:36 PM2021-02-15T16:36:59+5:302021-02-15T16:44:55+5:30

Attempt to murder : कोथरुड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक केली आहे.

Attempt to murder a young man by a goon over an old quarrel | जुन्या भांडणावरुन गुंडाकडून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

जुन्या भांडणावरुन गुंडाकडून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देअमोल रमेश गोडांबे (वय ३१, रा. केळेवाडी, पौड रोड) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी सविता परदेशी (वय ५२, रा. केळेवाडी, पौड रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

पुणे : जुन्या भांडणावरुन गुंडाने तरुणाच्या डोक्यात सत्तूरने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. कोथरुड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक केली आहे.

अमोल रमेश गोडांबे (वय ३१, रा. केळेवाडी, पौड रोड) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी सविता परदेशी (वय ५२, रा. केळेवाडी, पौड रोड) यांनी फिर्याद दिली आहे. परदेशी यांचा मुलगा आनंद परदेशी आणि अमोल गोडांबे यांच्यात यापूर्वी भांडणे झाली होती. आनंद परदेशीहा मामासाहेब मोहोळ शाळेसमोर मध्यरात्री थांबलेल्या असताना त्यांच्या गल्लीत राहणारा गोडांबे तेथे आला व त्याने जुन्या भांडणाच्या कारणावरुन आनंद याला आज खल्लास करीन जीवे ठार मारणार असे म्हणून शिवीगाळ करीत त्याच्या डोक्यात सत्तूरने वार करुन जबर जखमी केले. अमोल गोडांबे हा कोथरुड पोलिसांच्या रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव अधिक तपास करीत आहे. 

Web Title: Attempt to murder a young man by a goon over an old quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.