शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

पैशांसाठी विवाहितेला पेटवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 12:59 PM

विवाहित महिला तिच्या सासरी नांदत असताना आरोपींनी संगनमत करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.

ठळक मुद्देविवाहित महिलेने जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाण्यात दिली फिर्याद

पिंपरी : चार लाख रुपये माहेरून घेऊन येण्यास सांगून सासरच्यांनी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच ती झोपेत असताना तिला पेटवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. इंद्रायणीनगर, भोसरी येथे २४ नोव्हेंबर २०१९ रोजी हा प्रकार घडला.याप्रकरणी विवाहितेने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अशोक लक्ष्मण धवडे, सासू हिराबाई लक्ष्मण धवडे, सासरा लक्ष्मण आसाराव धवडे, मावस दीर पप्पू नारायण धवडे, एकनाथ लक्ष्मण धवडे, जाऊ उषाबाई एकनाथ धवडे, तसेच शांताबाई दगडू वापसे (सर्व रा. सेक्टर ७, एमआयडीसी, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहित महिला तिच्या सासरी नांदत असताना आरोपी यांनी संगनमत करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. माहेरून चार लाख रुपये घेऊन ये, असे त्यांनी सांगितले. आताच माझ्या वडिलांनी चार लाख रुपये दिले आहेत, असे फिर्यादी म्हणाल्या. त्यामुळे आरोपी यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच फिर्यादी झोपल्या असताना आरोपी यांनी त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देऊन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान विवाहित महिलेने जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार गोंदी पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेत एमआयडीसी भोसरी पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पांचाळ तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाPoliceपोलिस